गौतम अदाणी (Gautam Adani) हे सध्या सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक आहेत. अदाणी समूहाचे प्रमुख असलेल्या गौतम अदाणींचा जन्म २४ जून १९६२ रोजी अहमदाबाद, गुजरातमध्ये झाला. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी काम शिकण्यासाठी मुंबई (Mumbai) गाठली. हिऱ्यांचा व्यवसाय सुरु करुन ते पुन्हा गुजरातला परतले. १९८८ मध्ये त्यांनी अदाणी एंटरप्राईजेस या कंपनीची सुरुवात केली. हळूहळू त्यांनी अन्य क्षेत्रांमध्ये प्रवेश केला. गेल्याकाही वर्षांमध्ये गौतम अदाणी हे नाव सर्वांसाठी परिचयाचे झाले आहे. २०२१-२२ च्या सुमारास गौतम अदाणी हे जगातल्या१० सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक बनले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी असलेले जवळते संबंध त्यांच्या प्रगतीचे कारण आहे असे म्हणत त्यांच्यावर टीका देखील केली जाते. त्यांच्यावर काही खटले देखील सुरु आहेत.
२०२३ मध्ये शेअर मार्केटमध्ये मुद्दामून फेरफार करत घसरण आणल्याचे आरोप त्यांच्यावर केले आहेत. ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ या संस्थेने या संदर्भामध्ये अदाणी समूहावर जोरदार हल्लाबोल केला आहे. या प्रकरणाचा परिणाम अदाणींच्या शेअर्सवर झालेला पाहायला मिळाला. एकूण स्थिती पाहून सरकारने त्यावर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.Read More
Aaditya Thackeray On Adani Group : न्यायालयात ओबीसी आरक्षणाच्या रखडलेल्या खटल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याबाबत निश्चितता नाही.
Adani Group On Hindenburg : हिंडेनबर्ग रिसर्चने २०२३ मध्ये अदाणी समूहाला वारंवार लक्ष्य केले होते. आपल्या अहवालातून हिंडेनबर्गने केलेल्या आरोपांमुळे गौतम…