गौतमी पाटील Videos

गौतमी पाटील एक डान्सर आहे. व्हायरल डान्स व्हिडीओमुळे ती पहिल्यांदा चर्चत आली होती. विविध कार्यक्रमांमध्ये ती लावणी सादर करत असते. १९९६ मध्ये गौतमीचा जन्म शिंदखेडा या धुळे जिल्ह्यातील गावामध्ये झाला. लहानपणी गौतमीचे वडील तिला आणि तिच्या आईला सोडून गेले. त्यामुळे गौतमी तिच्या आईसह मामाच्या गावी म्हणजेच शिंदखेडाला राहायला गेली. याच गावामध्ये तिचे प्राथमिक शिक्षण झाले. शिक्षणामध्ये रस नसल्याने तिने आठवीमध्ये असतानाच शाळा सोडली. शाळा सोडून गौतमी पुण्यात राहू लागली. घरी हालाखीची परिस्थिती असल्याने तिला सुरुवातीला मिळेल ते काम करावे लागले. काही महिन्यांनंतर ती डान्स शोमध्ये बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम करु लागली.

अश्लील डान्स स्टेप्समुळे तिच्या कार्यक्रमांना गर्दी वाढू लागली. दरम्यानच्या काळात तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली. पण त्याचबरोबरीला नाचण्याच्या पद्धतीवरुन तिला ट्रोल देखील केले गेले. सध्या मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये नाचण्यासाठी सर्वाधिक मानधन घेणाऱ्या डान्सर्समध्ये गौतमी पाटीलचा समावेश होतो.
Read More
Gautami Patils visit to Pune Book Festival
Gautami Patil: पुणे बूक फेस्टिव्हलला गौतमी पाटीलची भेट; प्रवीण तरडेंनी पुस्तक निवडून दिलं नी मग..

Pune Book Festival Gautami Patil: पुणे बूक फेस्टिव्हलला चक्क प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिने भेट दिलीये. या पुस्तक महोत्सवात नाचायला…

Gautami Patil Movie Ghungroo
Gautami Patil Movie Ghungroo: “माझा चित्रपट सर्वांनी नक्की बघा”; गौतमी पाटीलचं चाहत्यांना आवाहन!

गौतमी पाटील हे नाव गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात सातत्याने चर्चेत आहे. सदैव वादामुळे चर्चेत राहिलेली गौतमी पाटील ही लवकरच चित्रपटात…

ravindra patil
Gautami Patil Father: “मी आता एकटाच राहतो, गौतमीने मला आर्थिक मदत..”; गौतमी पाटीलच्या वडिलांची मागणी

गौतमी पाटील हे प्रकरण मागील वर्सभरात महाराष्ट्रात चांगलंच चर्चेत राहिलं आहे. आधी अश्लील नृत्य मग कार्यक्रमातील राडे, कपडे बदलतानाचा व्हायरल…

ताज्या बातम्या