गिरीश बापट Videos

गिरीश बापट (Girish Bapat)हे महाराष्ट्राच्या १३ व्या विधानसभेचे सदस्य होते. हे कसबा पेठ मतदारसंघातून निवडून गेले. गिरीश बापट यांची २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवड झाली होती. गिरीश बापट यांचा जन्म ३ सप्टेंबर १९५० रोजी पुण्यात झाला. त्याने तळेगाव दाभाडे येथून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. पुढे वाणिज्य शाखेमध्ये शिक्षण घेण्यासाठी त्यांनी बीएमसीसीत प्रवेश घेतला. पदवी संपादन केल्यानंतर त्यांना टेल्कोमध्ये नोकरी लागली. नोकरी सुरु असताना लगेचच आणीबाणीचा काळ आला. आणीबाणीत सरकारविरोधी भूमिकेमुळे त्यांना १९ महिने तुरुंगवास भोगावा लागला. तुरुंगामध्ये असताना त्यांच्यातील पुढारी तयार झाला. ते सुरुवातीपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांनी प्रभावित होते.


राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि परिवारातील संस्थांतील विविध पदांची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पेलली. १९८० मध्ये गिरीश बापट भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहर विभागाचे प्रमुख बनले. पुढे १९८३ मध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर सलग तीन टर्म त्यांच्याकडे नगरसेवकपद होते. १९८६-८७ मध्ये ते महापालिकेत पक्षाची सत्ता नसतानाही स्थायी समितीचे अध्यक्ष होते. १९९५ मध्ये त्यांना पहिल्यांदा आमदारकीच्या निवडणूकीचे तिकीट मिळाले. निवडणूक जिंकून गिरीश बापट आमदार झाले. तेव्हापासून ते २०१४ पर्यंत ते तब्बल पाच वेळा निवडून आले.


२०१४ मध्ये फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे मंत्रीपद देखील होते. २०१९ मध्ये काँग्रेसच्या मोहन जोशी यांचा पराभव करत त्यांनी खासदारकी मिळवली. २९ मार्च २०२३ रोजी वयाच्या ७२ व्या वर्षी गिरीश बापट यांचे निधन झाले.


Read More
Neelam Gorhas criticism without mentioning the name of Dhangekar if it was Bapat Saheb
Neelam Gorhe on Ravindra Dhangekar: बापट साहेब असते तर…; धंगेकरांचं नाव न घेता नीलम गोऱ्हेंची टीका

काँग्रेसचे पुण्यातील लोकसभेचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांचं एक पोस्टर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांच्या फोटोसह भाजपाचे दिवंगत माजी खासदार गिरीश…