गोपीनाथ मुंडे News

गोपीनाथ मुंडे हे भाजपाचे एक दिग्गज नेते म्हणून ओळखले जात. जून २०१४ मध्ये गोपीनाथ मुंडे यांचं अपघाती निधन झालं. गोपीनाथ मुंडे हे भाजपातला ओबीसी चेहरा म्हणून ओळखले जात होते. त्यांनी महाराष्ट्रात भाजपा हा पक्ष मोठा करण्यात मोलाचा वाटा उचलला. शेठजी आणि भटजी यांचा पक्ष अशी असलेली भाजपाची ओळख पुसण्यात गोपीनाथ मुंडे यांचा सिंहाचा वाटा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गोपीनाथ मुंडे यांना गुरूस्थानी मानतात.


मुंडे सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पहिल्याच प्रयत्नात इ.स. १९७८ च्या बीड जिल्हापरिषदेची निवडणुकीत ते रेणापूर (उजनी) मतदारसंघातून राज्यभरात सर्वाधिक मताधिक्य घेऊन निवडून आले. मुंडे यांनी जनसंघ ते भाजपा अशी वाटचाल प्रमोद महाजन यांच्याबरोबर केली. बीड मतदारसंघात खांद्यावर शबनम पिशवी घेउन मोटरसायकलवरून मुंडेंनी भाजपासाठी प्रचार केला. त्यावेळी भाजपचे १४ उमेदवार निवडून आले. महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव पाडतील असे हाताच्या बोटावर मोजण्याइतके मोजके नेते असतील. त्यात गोपीनाथ मुंडे यांचं नाव ठळकपणाने घ्यावं लागेल. आपल्या ३५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक चढउतार अनुभवलेल्या या नेत्याने राजकारणात आपले स्वतःचे असे विशेष स्थान निर्माण केले होते.


Read More
Dasara Melava Beed News
Dasara Melava Beed : पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला धनंजय मुंडे लावणार हजेरी; बहीण-भाऊ पहिल्यांदाच भगवान भक्तीगडावर एकत्र येणार

Dasara Melava Beed : दसरा मेळाव्याला पहिल्यांदाच बहीण-भाऊ अर्थात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे एकत्र उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे…

What Murlidhar Mohol Said?
“गोपीनाथ मुंडेंनी मुलासारखं प्रेम केलं, आज ते…”, आठवणी सांगताना मुरलीधर मोहोळ भावूक

महापौर म्हणून काम केल्याने मला शशहराचा आवाका समजला होता. त्याचा फायदा झाला असंही मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं.

Gopinath munde and pankaja munde
गोपीनाथ मुंडेंच्या पुण्यतिथी दिवशीच लागणार लोकसभेचा निकाल; १० वर्षांनी आलेल्या योगायोगाबद्दल पंकजा मुंडे म्हणाल्या, “याकडे मी…”

गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी दिवशीच लोकसभेचा निकाल लागणार असल्याने पंकजा मुंडे भावूक झाल्या आहेत.

pankaja munde madhav formula marathi news, pankaja munde latest marathi news
पंकजा मुंडे यांना ‘माधव’चे बळ प्रीमियम स्टोरी

भाजपने पक्ष स्थापनेपासून ठरवलेल्या सूत्रानुसार ‘माधवं’ केंद्रीत प्रचार हाताळणारा चेहरा म्हणून गोपीनाथ मुंडेंचे नेतृत्त्व पुढे आणले.

Dispute between uncle and nephews
काकांच्या आयुष्यात पुतण्या व्हिलन! महाराष्ट्राच्या राजकारणातल्या तीन घराण्यांचं कनेक्शन!

महाराष्ट्राच्या राजकारणात काका पुतण्यांचं वैर हे काही नवं नाही. तीन प्रमुख घराण्यांमध्येच हे वाद झाल्याचं महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलं आहे.

Pankja Munde Speech
“परदा गिर चुका है, तालियाँ फिर भी…”; अमित शाह मंचावर असताना काय म्हणाल्या पंकजा मुंडे? प्रीमियम स्टोरी

छत्रपती संभाजी नगरच्या सभेत पंकजा मुंडे यांनी मोदी सरकारच्या विविध कामांचं, योजनांचं कौतुक केलं.

Vilasrao deshmukh statue
भाजपच्या खासदारद्वयीचा विलासरावांच्या पुतळ्यासाठी पुढाकार, मुंडेंचे स्मृती भवन दुर्लक्षित !

गोपीनाथ मुंडे स्मृती-भवनाच्या कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या भाजपच्या नांदेड आणि लातूर मतदारसंघांच्या खासदारद्वयांनी माळाकोळीजवळच्या माळेगाव यात्रा परिसरात काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव…

pankaja munde (5)
“दारु प्यायची असेल तर हातभट्टीची पिऊ नका, पुड्या खाऊन….”, पंकजा मुंडेंचा कार्यकर्त्यांना सल्ला

पंकजा मुंडे यांनी काय काय म्हटलं आहे? रक्तदान करताना त्या कार्यकर्त्यांना काय म्हणाल्या?

pankaja munde in verul
“…अन् मी एका क्षणात राजकारणात आले”, पंकजा मुंडेंनी सांगितली आठवण; म्हणाल्या, “मस्त एशो-आरामात…”

“माझ्या मेळाव्याला ना भजन आहे, ना भोजन आहे, तरीही तुम्ही येता. बसायलाही जागा होत नाही”, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

Pankaja-Munde-1
“वादळ येणार होतं, पण त्याची दिशा…”, एकनाथ खडसेंबरोबरच्या बैठकीनंतर पंकजा मुंडेंचं विधान

“गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना या गडावर येण्याचा अधिकार आहे,” असं पंकजा मुंडेंनी सांगितलं.