गोपीनाथ मुंडे Photos
गोपीनाथ मुंडे हे भाजपाचे एक दिग्गज नेते म्हणून ओळखले जात. जून २०१४ मध्ये गोपीनाथ मुंडे यांचं अपघाती निधन झालं. गोपीनाथ मुंडे हे भाजपातला ओबीसी चेहरा म्हणून ओळखले जात होते. त्यांनी महाराष्ट्रात भाजपा हा पक्ष मोठा करण्यात मोलाचा वाटा उचलला. शेठजी आणि भटजी यांचा पक्ष अशी असलेली भाजपाची ओळख पुसण्यात गोपीनाथ मुंडे यांचा सिंहाचा वाटा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गोपीनाथ मुंडे यांना गुरूस्थानी मानतात.
मुंडे सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पहिल्याच प्रयत्नात इ.स. १९७८ च्या बीड जिल्हापरिषदेची निवडणुकीत ते रेणापूर (उजनी) मतदारसंघातून राज्यभरात सर्वाधिक मताधिक्य घेऊन निवडून आले. मुंडे यांनी जनसंघ ते भाजपा अशी वाटचाल प्रमोद महाजन यांच्याबरोबर केली. बीड मतदारसंघात खांद्यावर शबनम पिशवी घेउन मोटरसायकलवरून मुंडेंनी भाजपासाठी प्रचार केला. त्यावेळी भाजपचे १४ उमेदवार निवडून आले. महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव पाडतील असे हाताच्या बोटावर मोजण्याइतके मोजके नेते असतील. त्यात गोपीनाथ मुंडे यांचं नाव ठळकपणाने घ्यावं लागेल. आपल्या ३५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक चढउतार अनुभवलेल्या या नेत्याने राजकारणात आपले स्वतःचे असे विशेष स्थान निर्माण केले होते.
Read More