सरकारी नोकरी Videos

लोकसत्ता डॉट कॉमच्या या सदरामध्ये सरकारी नोकरीशी संबंधित माहिती (Govt Jobs) देण्यात येईल. सध्या तरुण पिढी नोकरी शोधण्यासाठी विविध मार्गांचा वापर करत असते. काहीजणांना शैक्षणिक संस्थांद्वारे नोकरीची संधी उपलब्ध होते. तर काहीजण पारंपारिक माध्यमांचा वापर नोकरीबाबतची माहिती मिळवण्यासाठी करत असतात. आपला उदरनिर्वाह चालावा या उद्देशासाठी अनेकजण ऑनलाइन माध्यमांची मदत घेत असतात. तरुणांची ही गरज ओळखून लोकसत्ता डॉट कॉम सरकारी नोकरी हे सदर सुरु केले आहे. यामध्ये शासनाच्या विविध क्षेत्रातील, श्रेणीतील भरती, नोकऱ्यांची संधी याविषयी सविस्तर माहिती दिली जाते.

याशिवाय त्यामध्ये नोकरीचा अर्ज कसा करावा, त्यासाठी कोणत्या वेबसाइटची मदत घ्यावी, अर्ज करण्यासाठीची पात्रता, त्यासाठीचे कागदपत्र वगैरे माहिती देखील या सदरातील बातम्यांमध्ये देण्यात येते. सरकारने आयोजित केलेल्या भरती कार्यक्रमाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध असल्यास संबंधित माहिती देखील या सदरामध्ये मिळू शकते.

विद्यार्थी दशेमध्ये असणाऱ्यांसाठी तसेच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी हे सदर खूप फायदेशीर ठरु शकते. यामध्ये दरदिवशी किंवा ठराविक दिवसांनी भरतीसंबंधित बातम्या, अपडेट्स पाहायला मिळतात.


Read More