गुजरात टायटन्स Photos

गुजरात टायटन्स (Gujrat Titans) हा इंडियन प्रीमिअर लीगच्या पंधराव्या हंगामामधील सर्वात यशस्वी संघ आहे. या संघाने गतवर्षी (२०२२) आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. नरेंद्र मोदी स्टेडियम हे या संघाचे होम ग्राऊंड आहे. या संघाची मालकी सीव्हीसी कॅपिटल पार्टनर्स यांच्याकडे आहे. आयपीएलची वाढती व्याप्ती पाहून आणखी काही संघ वाढवण्याचा निर्णय बीसीसीआयद्वारे घेण्यात आला. त्यानुसार आयपीएलमध्ये गुजरात आणि लखनऊ या दोन संघांचा समावेश करण्यात आला.


२0२२ मध्ये पार पडलेल्या मेगा ऑक्शनमध्ये गुजरात संघाच्या व्यवस्थापकांनी मुंबई इंडियन्सच्या हार्दिक पांड्या (Hardik Pandya) बोली लावली. पुढे त्याच्यावर या नव्या संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी टाकण्यात आली. संघामध्ये इतर अष्टपैलू खेळाडूंचाही समावेश होता. या हंगामादरम्यात संघातील बहुतांश खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये होते. सुरुवातीपासून हा संघ चांगली कामगिरी करत गुणांच्या बाबतीमध्ये अग्रेसर होता. यंदाच्या सोळाव्या हंगामामध्ये हार्दिकच्या संघासमोर चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान असणार आहे. गतवर्षी प्रमाणे यंदाही हा संघ अचूक खेळ करेल अशी चाहत्यांना आशा आहे.


Read More
Who is Rinku Singh
12 Photos
Rinku Singh: शेवटच्या चेंडूवर गुजरात टायटन्सच्या जबड्यातून विजय हिसकावणाऱ्या रिंकू सिंगची संघर्षमय कहाणी, घ्या जाणून

Who is Rinku Singh: आयपीएल २०२३ च्या १३ व्या सामन्यात केकेआरने गुजरातचा ३ गडी राखून पराभव केला. या सामन्यात केकेआरसाठी…

18 Photos
IPL 2022 : गुजरात टायटन्सच्या विजयानंतर #Fixing चा सोशल मीडियावर ट्रेण्ड; अमित शहांचे सामनादरम्यानचे फोटो व्हायरल

गुजरात टायटन्सने आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर सोशल मीडियावर फिक्सिंग हॅशटॅग ट्रेण्ड होत आहे.

IPL 2022 Gujrat Titans
18 Photos
Photos : पांड्या पलटनची विजयी घौडदौड; फायनलमध्ये पोहोचल्यानंतर गुजरात टायटन्सची कॅप्टनसाठी खास पोस्ट

आयपीएलच्या १५व्या हंगामातील फायनलमध्ये पोहोचणारा गुजरात टायटन्स पहिला संघ ठरला आहे.