राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची जन्मभूमी असलेले गुजरात (Gujarat) हे राज्य व्यापारासाठी फार प्रसिद्ध आहे. इतिहासकारांनुसार, भारतातील सर्वात पहिले बंदर लोथल गुजरातमध्ये होते. गुजरात आणि राजस्थान यांची सीमा जवळ असल्याने आणि गुजरातला समुद्रकिनारपट्टी लाभल्यामुळे तेथे व्यापारासाठी पूरक परिस्थिती फार पूर्वीपासून होती. भारताच्या एकूण औद्योगिक उत्पन्नातील गुजरातचा वाटा १९.८% आहे. हे राज्य सर्व विभागांमध्ये प्रगती करत आहे. गुजरातमध्ये २६ जिल्हे आहेत. गांधीनगर ही गुजरातची राजधानी असली, तरी सुरत आणि अहमदाबाद या शहरांविषयीचे आकर्षणही लोकांमध्ये पाहायला मिळते.
सध्या भारतीय जनता पक्षाची सत्ता या राज्यामध्ये आहे. या पक्षाचे भूपेंद्र पटेल गुजराते मुख्यमंत्री आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे आहेत. या राज्याचे सर्वाधिक काळासाठी मुख्यमंत्रीपद त्यांनी भूषिवले आहे. गुजरात दांडिया, गरबा – जलेबी फाफडा अशा गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. Read More
इंडियन वेस्ट कोस्ट फिशरमेन फेडरेशनच्या शिष्टमंडळाने ०८ एप्रिल २०२५ रोजी गुजरात राज्याचे मत्स्योद्योग मंत्री राघवजीभाई पटेल यांची भेट घेऊन सद्यपरस्थिती…
२००२ च्या गुजरात दंगलीचे कथित चित्रण केल्याबद्दल उजव्या विचारसरणीच्या गटातील समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात आला. २७ दृश्यांना कात्री…