गुजरात लायन्स Videos

चैन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांवर बंदी आल्याने आयपीएलमध्ये काही नव्या संघाचा समावेश करण्यात आला. यामध्ये गुजरात लायन्स हा संघ सर्वात जास्त लोकप्रिय ठरला. या संघाचा कर्णधार सुरेश रैना होता. आयपीएलच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सुरेश रैना आणि महेंद्र सिंह धोनी वेगवेगळ्या संघांकडून खेळत होते. संघामध्ये अनेक चांगले खेळाडू होते. २०१६ च्या पर्वामध्ये हा संघ अव्वल स्थानावर होता. पण त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. त्यानंतर २०१७ च्या आयपीएलच्या हंगामामध्ये गुजरात लायन्सचा संघ सुरुवातीपासूनच कमकुवत वाटत होता. प्राथमिक फेरीमध्ये त्यांनी बरेचसे सामने गमावले. सीएसके आणि आरआर यांच्यावरील बंदी उठवल्यानंतर गुजरातचा हा संघ संपुष्टात आला. केशव बन्संल हे या संघाचे मालक होते. Read More

ताज्या बातम्या