हरमनप्रीत कौर Videos

हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) ही सध्याची महिला भारतीय क्रिकेट संघाची कर्णधार (Captain) आहे. ८ मार्च १९८९ रोजी तिचा जन्म पंजाबमध्ये झाला. वयाच्या २० व्या वर्षी तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले. २००९ मध्ये महिला विश्वचषकादरम्यानचा भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) हा तिच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील पहिला सामना ठरला. नोव्हेंबर २०१८ मध्ये टी-२० सामन्यांमध्ये शतकीय कामगिरी करत तिने इतिहास रचला.

२०१९ मध्ये ती १०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी पहिली क्रिकेटपटू ठरला. याच काळात ती बिग बॅश लिगमध्येही खेळली. जुलै २०२२ मध्ये तिच्यावर भारतीय महिला क्रिकेट संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. तिच्याकडे १४७ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने, १२४ एकदिवसीय आणि ३ कसोटी सामने खेळण्याचा दांडगा अनुभव आहे. नुकत्याच झालेल्या महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबईने हरमनप्रीत कौरवर १.८० कोटी रुपयांची बोली लावत तिला आपल्या संघात सहभागी केले.Read More