हेल्दी लाइफस्टाइल Videos

बदलत्या सवयी व बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या आयुष्यात अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. प्रत्येक पिढीच्या जीवनशैलीत बदल होत आहेत आणि या बदलांचे दुष्परिणाम आरोग्यावर होत आहेत. ज्यामुळे असंसर्गजन्य असे रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, स्थूलत्व, सांधेदुखी, मानसिक ताणतणाव अशा प्रकारचे आजार वाढू लागले आहेत. बदलत्या जीवनशैलीतही आरोग्य उत्तम राखण्यासाठी सकस आहार घेणे गरजेचे आहे. कामामुळे खाण्याच्या वेळा अनियमित असतात. वेळेअभावी काही वेळा खाल्लेच जात नाही. काम संपल्यावर मात्र, मनाचे समाधान होईल असे काहीतरी अरबटचरबट खाल्ले जाते. हे टाळलं पाहिजे. नियमित वेळेतच जेवण केले पाहिजे. तसेच फास्ट फूड व जंक फूड टाळायलाच हवे. समतोल आहार, नियमित व्यायाम व पुरेशी शांत झोप ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे. दैनंदिन जीवनात नियमितपणा ठेवणे आवश्यक आहे. म्हणूनच वेळच्या वेळी जेवण, नियमित झोप व ठरलेल्या वेळी व्यायाम असा आपला जीवनक्रम ठरलेला असावा. ऋतुमानानुसार आहारात आवश्यक तो बदल करावा. रोजच्या आहारात ऋतुमानाप्रमाणे मिळणारी फळे व भाज्या अवश्य असाव्यात. Read More
How To Avoid The Pain Of Migraine With A Healthy Diet
Health Special: चहा, कॅाफीमुळे मायग्रेनचा त्रास वाढू शकतो? नेमकं कारण जाणून घ्या | Migraine Diet

सविस्तर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा- https://www.loksa.in/9uIv7B मायग्रेनचा त्रास असणारे अनेकजण आपल्या अवतीभोवती तुम्ही पाहिले असाल. अनेक उपाय करूनही मायग्रेनचा…

ताज्या बातम्या