हेमा मालिनी News

हेमा मालिनी या अभिनेत्री तसेच राजकारणी आहेत. ‘ड्रीम गर्ल’ अशी ओळख असणाऱ्या हेमा मालिनी यांचा जन्म १६ ऑक्टोबर १९४८ रोजी झाला. १९६३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इधू साथियम’ या तमिळ चित्रपटाद्वारे त्यांनी सिनेविश्वामध्ये प्रवेश केला. पुढे १९६८ मध्ये त्यांनी ‘सपनों का सौदागर’ या हिंदी चित्रपटापासून चित्रपटांमध्ये प्रमुख नायिका म्हणून काम करायला सुरुवात केली. ‘जॉनी मेरा नाम’, ‘सीता गीता’, ‘शोले’, ‘सत्ते पे सत्ते’, ‘क्रांती’ यांसारखे असंख्य चित्रपट केले आहेत. अभिनेते धर्मेंद यांच्या त्यांनी ‘तू हसीन मैं जवान’ या चित्रपटामध्ये पहिल्यांदा काम केले. एकत्र काम करताना ते दोघे प्रेमात पडले. १९८० साली त्यांनी लग्न केले. त्यांना ईशा आणि अहाना अशा दोन मुली आहेत. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी २८ पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये सोबत काम केले आहे. अभिनयासह त्यांनी दिग्दर्शन आणि निर्मितीचीही आवड आहे. हेमा यांनी लहानपणी भरतनाट्यमचे शिक्षण घेतले आहे.


अभिनय क्षेत्रात आपल्या ठसा उमटवल्यानंतर त्यांनी राजकारण प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. फेब्रुवारी २००४ मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. २००३ ते २००९ दरम्यान राज्यसभा सदस्य राहिल्यानंतर २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये हेमा मालिनी उत्तर प्रदेशच्या मथुरा मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून आल्या. त्यानंतर २०१९ आणि २०२४ मध्येही त्यांनी मथुरा मतदारसंघातून निवडून आल्या. हेमा मालिनी या विद्यमान खासदार आहेत. त्यांना २००० साली भारत सरकारने पद्मश्री देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते.


Read More
dharmendra refuse to work with hema malini
धर्मेंद्र यांनी ‘या’ कारणामुळे दिला होता हेमा मालिनी यांच्याबरोबर काम करण्यास नकार, खुद्द ड्रीम गर्लनेच केला खुलासा…

हेमा मालिनी यांनी ‘हेमा मालिनी: बियॉन्ड द ड्रीम गर्ल’ या पुस्तकात धर्मेंद्र यांनी त्यांच्याबरोबर काम करण्यास नकार दिला होता असे…

When Dharmendra answered if he converted to Islam to marry Hema Malini
धर्मेंद्र यांनी हेमा मालिनींशी दुसरं लग्न करण्यासाठी इस्लाम स्वीकारण्याबाबत दिलेलं उत्तर, म्हणालेले “मी असा माणूस…”

Dharmendra Hema Malini Wedding Story: विवाहित धर्मेंद्र यांनी हेमा मालिनींशी दुसरं लग्न करण्यासाठी स्वीकारला होता इस्लाम धर्म? त्यांनीच दिलेलं उत्तर

esha deol pune horrifying experience
“गर्दीतील एकाने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श…”, ईशा देओलबरोबर पुण्यात घडलेला धक्कादायक प्रसंग; म्हणाली, “मी त्याला…”

Esha Deol Horrifying Experience: एका चित्रपटाच्या प्रिमियरवेळी पुण्यात घडलेला भयंकर प्रसंग ईशा देओलने सांगितला आहे.

hema malini video
फोटो काढायला आलेल्या चाहतीचा हात झटकून हेमा मालिनी म्हणाल्या असं काही की…; व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले

Hema Malini Video: हेमा मालिनींचा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी ‘त्या’ गोष्टीकडे वेधलं लक्ष

Hema Malini and Vinesh Phogat
आधी वादग्रस्त वक्तव्य, आता हेमा मालिनींनी केलं विनेश फोगटचं कौतुक; नेटकरी ट्रोल करीत म्हणाले, “अत्यंत लाजिरवाणे…”

Hema Malini: हेमा मालिनी यांनी विनेश फोगटच्या अपात्रतेनंतर वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत तिचे कौतुक…

Celebrity Candidates Who Won Lok Sabha Polls Kangana Ranaut Hema Malini Arun Govil Manoj Tiwari
कंगना रणौत, हेमा मालिनी ते अरुण गोविल! लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या सेलिब्रिटींचं काय झालं?

भाजपाला चारशेपार जाण्याचा आत्मविश्वास असताना त्यांच्या आहे त्या जागाही कमी झाल्या आहेत तर इंडिया आघाडीच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

lok sabha election result 2024 from kangana ranaut arun govil and nirhua hema malini he reputation of these stars is at stake
कंगना, रणौत, अरुण गोविल ते निरहुआ…; ‘या’ बॉलीवूड स्टार्सची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?

लोकसभा निवडणुकीत अनेक बॉलीवूड स्टार्सही आपले नशीब आजमावत आहेत. काही जण तर पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

madhoo relation with hema malini juhi chawla
माहेरी हेमा मालिनी तर सासरी जुही चावलाची नातेवाईक आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री; म्हणाली, “त्यांनी माझ्या पतीच्या…”

कोण आहे या दिग्गज अभिनेत्रींची नातेवाईक? अनेक चित्रपटांमध्ये केलंय काम

Krishna Janmabhoomi case mathura
‘श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह वाद’ भाजपासाठी फायद्याचा ठरणार? मथुरावासीयांच्या काय आहेत भावना?

शाही ईदगाह आणि कृष्ण जन्मभूमी वादाचा भाजपा नेत्यांच्या भाषणात उल्लेख आढळत नसला तरी स्थानिकांमध्ये या विषयावर चर्चा होत आहे. मतदारांमध्ये…

Loksabha Election 2024 Hema Malini Ravi Kishan Harish Rawat working in fields
हेमा मालिनींकडून शेतात खुरपणी तर रवी किशन चहाच्या टपरीवर; मतांसाठी कोण काय काय करतंय? प्रीमियम स्टोरी

निवडणूक जवळ आली की राजकारणी लोकांमध्ये अधिक मिसळायला लागतात. मात्र, त्यांचे हे मिसळणे नैसर्गिक नसले तर त्यावर टीकाही होते.

hema malini and yogi
‘काँग्रेसचे मानसिक संतुलन ढळले’; हेमा मालिनी यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह विधानांनंतर भाजपची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मथुरेच्या खासदार आणि उमेदवार हेमा मालिनी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधाने केल्याचा आरोप भाजपने काँग्रेस नेत्यांवर केला आहे.

randeep surjewala made controversial remarks on hema malini
हेमा मालिनी यांच्याबाबत रणदीप सुरजेवालांचं वादग्रस्त वक्तव्य, कंगनाची तिखट शब्दांत प्रतिक्रिया, “द्वेष आणि तिरस्कार..”

रणदीप सुरजेवाला यांनी जे वक्तव्य केलं त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.