हेमा मालिनी Photos
हेमा मालिनी या अभिनेत्री तसेच राजकारणी आहेत. ‘ड्रीम गर्ल’ अशी ओळख असणाऱ्या हेमा मालिनी यांचा जन्म १६ ऑक्टोबर १९४८ रोजी झाला. १९६३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इधू साथियम’ या तमिळ चित्रपटाद्वारे त्यांनी सिनेविश्वामध्ये प्रवेश केला. पुढे १९६८ मध्ये त्यांनी ‘सपनों का सौदागर’ या हिंदी चित्रपटापासून चित्रपटांमध्ये प्रमुख नायिका म्हणून काम करायला सुरुवात केली. ‘जॉनी मेरा नाम’, ‘सीता गीता’, ‘शोले’, ‘सत्ते पे सत्ते’, ‘क्रांती’ यांसारखे असंख्य चित्रपट केले आहेत. अभिनेते धर्मेंद यांच्या त्यांनी ‘तू हसीन मैं जवान’ या चित्रपटामध्ये पहिल्यांदा काम केले. एकत्र काम करताना ते दोघे प्रेमात पडले. १९८० साली त्यांनी लग्न केले. त्यांना ईशा आणि अहाना अशा दोन मुली आहेत. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी २८ पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये सोबत काम केले आहे. अभिनयासह त्यांनी दिग्दर्शन आणि निर्मितीचीही आवड आहे. हेमा यांनी लहानपणी भरतनाट्यमचे शिक्षण घेतले आहे.
अभिनय क्षेत्रात आपल्या ठसा उमटवल्यानंतर त्यांनी राजकारण प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. फेब्रुवारी २००४ मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. २००३ ते २००९ दरम्यान राज्यसभा सदस्य राहिल्यानंतर २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये हेमा मालिनी उत्तर प्रदेशच्या मथुरा मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून आल्या. त्यानंतर २०१९ आणि २०२४ मध्येही त्यांनी मथुरा मतदारसंघातून निवडून आल्या. हेमा मालिनी या विद्यमान खासदार आहेत. त्यांना २००० साली भारत सरकारने पद्मश्री देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
Read More