हिंदी सिनेमा News
हा चित्रपट हिंदी भाषेमध्ये तयार करण्यात आला होता. १९२० ते १९४० या कालखंडामध्ये भारतामध्ये चित्रपट निर्मितीचे प्रमाण तुलनेने कमी होते. पुढे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या उद्याेगामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मुंबई शहर सामानाची दळणवळण आणि प्रवास या दोन्हींसाठी अनुकूल असल्याने हिंदी सिनेसृष्टी म्हणजेच बॉलिवूडची अधिकृत स्थापना मुंबईमध्ये झाली.
भारतामध्ये दर वर्षी १००० पेक्षा जास्त हिंदी चित्रपट (Hindi Cinema) तयार केले जातात. चित्रपटांचा हा व्यवसाय अनेकांसाठी उदरनिर्वाहाचे साधन आहे. भारतीयांच्या जगण्यावर हिंदी सिनेमाचा महत्त्वपूर्ण परिणाम प्रकर्षाने जाणवतो. Read More