
‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्हाला हिंदी चित्रपटांबाबत (Hindi Movie) माहिती मिळेल. हिंदी चित्रपटसृष्टीला बॉलीवूड या नावानेदेखील ओळखले जाते. हिंदी चित्रपटसृष्टी मुंबई शहरात वसलेली आहे. हे चित्रपट भारतासह जगभरातील विविध देशांमध्ये प्रदर्शित होतात.
हिंदी चित्रपटांमध्ये अनेक गीते आणि नृत्येही असतात. प्रेम, देशभक्ती, कुटुंब, भयपट, कॉमेडी अशा विविध विषयांवर आधारित चित्रपट प्रदर्शित होतात. हिंदी चित्रपटसृष्टी जगभरातील सर्वांत मोठ्या केंद्रांपैकी एक आहे.
बॉलीवूडमध्ये काम करणाऱ्यांची संख्या आणि निर्मित केल्या जाणाऱ्या चित्रपटांची संख्या पाहता ही जगभरातील सर्वात मोठी चित्रपट उद्योगांपैकी एक आहे हे स्पष्ट होते.१९९५ मध्ये लिमियर ब्रदर्सने पॅरिस सलूनच्या सभा भवनमध्ये प्रदर्शित केलेला पहिला चित्रपट म्हणजे ‘इंजिन ट्रेन’. याच लिमियर ब्रदर्सने ७ जुलै १८९६ मध्ये मुंबईतील वॉटसन हॉटेलमध्ये चित्रपटाचा पहिला शोदेखील प्रदर्शित केला होता. प्रतिव्यक्ती एक रुपया प्रवेश शुल्क भरून, मुंबईतील उच्चभ्रू लोकांनी या शोचे स्वागत केले. त्या दिवशी भारतीय चित्रपटसृष्टीचा जन्म झाला.
राजा हरिश्चंद्र (१९१३) भारतामध्ये तयार होणारा पहिला हिंदी चित्रपट होता; जो दादासाहेब फाळके यांनी दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट लवकरच भारतात लोकप्रिय झाला. १९३० पर्यंत वर्षाला सुमारे २०० चित्रपट बनवले जात होते. अर्देशीर इराणी यांनी बनवलेला आलम आरा हा पहिला बोलपट होता. हा चित्रपट खूप गाजला होता. कालांतराने हिंदी चित्रपटसृष्टीची वेगाने प्रगती झाली आणि एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपट प्रदर्शित झाले. येथे तुम्हाला हिंदी चित्रपटांशी संबंधित सर्व माहिती एका क्लिकवर मिळेल. कोणते नवीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत? चित्रपटामध्ये कोण अभिनेता आणि अभिनेत्री आहेत? चित्रपटाचे परीक्षण, तसेच दिग्गज अभिनेते, गायक, दिग्दर्शक यांचे हिंदी चित्रपटसृष्टीमधील योगदान अशी सर्व माहिती येथे तुम्हाला मिळू शकते.