हिंगणघाट Videos

हिंगणघाट (Hinganghat) हे वर्धा जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण शहर आहे. क्षेत्रफळ आणि लोकसंख्या या दोन्ही बाबतीमध्ये हे शहर तुलनेने मोठं आहे. या तालुक्यामध्ये ७६ गावांचा समावेश होतो. हिंगणघाट वर्ध्यापासून ३५ किमी तर महाराष्ट्राची राजधानी असलेल्या नागपूर शहरापासून ७२ किमी लांब आहे. पूर्वी या ठिकाणाचा उल्लेख दांडुंग्राम या नावाने केला जात असे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, साक्षरतेच्या बाबतीमध्ये हिंगणघाट महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रंमाकावर आहे. येथे प्रामुख्याने कापसाची शेती केली जात असे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापसाची मंडई या ठिकाणी आहे. विठ्ठलाची जगातली सर्वात उंच मूर्ती हिंगणघाटामध्ये आहे. या मूर्तीची उंची १६ मी. (५२ फुट) आहे. गेल्या काही वर्षांमध्ये हिंगणघाटच्या महामार्गावरील अपघातांचे प्रमाण वाढले आहे.Read More