हॉकी (Hockey) हा खेळ भारतामध्ये खूप आधीपासून खेळला जात आहे. भारतीय हॉकी संघाने आत्तापर्यंत १९२८, १९३२, १९३६, १९४८, १९५२, १९५६, १९६४ आणि १९८० या वर्षी आयोजित केलेल्या ऑलिम्पिकमध्ये अव्वल येत सुवर्णपदक मिळवले आहे. मेजर ध्यानचंद हे भारताचे सर्वोत्कृष्ट हॉकीपटू (Hockey Players) होते. त्यांनी ऑलिम्पिकमधील अनेक हॉकी सामने गाजवले होते. त्यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत. या खेळाचा उगम मध्ययुगीन काळातील स्कॉटलंड, नेदरलँड आणि इंग्लंडमध्ये असल्याचे मानले जाते. प्रत्येक संघात गोलरक्षकासह अकरा खेळाडू असतात.
हॉकी (Hockey) हा पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ आहे आणि भारताचा कोणताही अधिकृत राष्ट्रीय खेळ नसला तरी सामान्यतः भारताचा राष्ट्रीय खेळ म्हणून त्याची गणना केली जाते. इंडियन हॉकी फेडरेशन ही संस्था भारतामध्ये हॉकीशी निगडीत सर्व व्यवस्था पाहत असते. या संस्थेची स्थापना १९२५ साली करण्यात आली होती. Read More
Asian Champions trophy 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावणाऱ्या भारतीय हॉकी संघाची चमकदार कामगिरी सुरूच आहे. कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारताने…