जपानी वाहन निर्मात्या निसान आणि होंडाच्या संचालक मंडळांनी गुरुवारी स्वतंत्रपणे झालेल्या बैठकांतून विलीनीकरणाची चर्चा अधिकृतपणे संपुष्टात आणण्याच्या बाजूने कौल दिला.
चिनी कंपन्यांकडून तीव्र स्पर्धा निर्माण झाल्यामुळे, मोटारनिर्मिती क्षेत्रात एके काळी दादा असलेल्या जपानी कंपन्यांना अस्तित्वासाठी वेगवेगळे पर्याय निवडावे लागत आहेत.
विलीनीकरणामुळे दोन्ही कंपन्यांना एकमेकांची संसाधने वापरण्याची संधी मिळेल आणि अमेरिकेच्या टेस्ला व चीनमधील बीवायडी यासारख्या प्रतिस्पर्ध्यांपुढे समर्थपणे उभे राहता येऊ…