राशीभविष्य News
लोकसत्ता डॉटकॉमच्या या सदरामध्ये तुम्हाला राशीभविष्याबाबत (Horoscope) माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्र हे वेदांइतकेच प्राचीन आहे. प्राचीन काळात ग्रह, नक्षत्र आणि अन्य खगोलीय हालचाली आणि स्थितीचा अभ्यास केला जात असे; यालाच ज्योतिष म्हटले जाते.
एखाद्या व्यक्तीच्या जन्मवेळेची स्थिती, आकाशातील ग्रह-ताऱ्यांची स्थिती आणि नंतर ग्रह ताऱ्यांची बदलणारी स्थिती याचा परिणाम माणसाच्या आयुष्यावर होत असतो असे मानले जाते. मंगळ, रवि, शनि, गुरू, शुक्र, चंद्र, राहू, केतू, बुध या ग्रहांचे भ्रमण होत असते. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ , वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशी आहेत. ग्रहांच्या स्थितीमध्ये बदल झाला की, १२ राशींच्या व्यक्तींवर शुभ-अशुभ परिणाम होत असतात.
जोतिष्यशास्त्र अभ्यासक याचा अभ्यास करून अंदाज वर्तवतात. लोकांना आपल्या राशीनुसार भविष्य जाणून घेण्यात फार रस असतो. ग्रहांच्या बदलत्या स्थितीबाबत आणि राशींवर होणाऱ्या परिणामांबाबत येथे माहिती दिली जाते. तुम्ही तुमचे आजचे राशीभविष्य येथे एका क्लिकवर जाणून घेऊ शकता. तसेच तुमच्या राशीवर बदलत्या ग्रहस्थितींचा काय परिणाम होतो, याबाबतही माहिती दिली आहे.
Read More