हृतिक रोशन हा बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता आहे. त्याचा जन्म १० जानेवारी १९७४ रोजी मुंबईमध्ये झाला. त्याचे संपूर्ण नाव हृतिक रोशन नागरथ असे आहे. त्याचे संपूर्ण कुटुंब चित्रपट व्यवसायामध्ये कार्यरत आहे. त्याने माहीमच्या बॉम्बे स्कॉटिश स्कूल या शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे. शाळेत डाव्या हातामध्ये असलेल्या अतिरिक्त अंगठ्यामुळे त्याला चिडवले जात आहे. यामुळे तो शाळेत जाणे टाळायचा. वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत तो बोलताना अडखळायचा. हळूहळू त्याने या समस्यांवर मात केली. याच सुमारास हृतिकने त्याच्या आजोबांच्या म्हणजेच ओम प्रकाश यांच्या ‘आशा’ या चित्रपटाद्वारे बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केले. १९८० पासून त्याचा बॉलिवूडमधील प्रवास सुरु झाला. कॉलेजमध्ये असताना हृतिकने त्याच्या वडिलांच्या (राकेश रोशन) करन-अर्जुन, कोयला अशा काही चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शन केले. २००० मध्ये राकेश रोशन यांनी हृतिक आणि अमीशा पटेल ही फ्रेश जोडी घेऊन ‘कहो ना प्यार है’ हा चित्रपट बनवला. या चित्रपटामुळे हृतिक रातोरात स्टार झाला. त्याच्या या चित्रपटाने अनेक विक्रम मोडत इतिहास रचला. ‘कहो ना प्यार है’ च्या यशानंतर त्याला निर्मात्यांच्या ऑफर्स येऊ लागल्या. पुढील काही वर्षांमध्ये प्रदर्शित झालेले त्याचे चित्रपट फ्लॉप झाले. चुकीची संहिता निवडल्याने चित्रपट फ्लॉप असल्याचे त्याच्या लक्षात आल्याने तो चित्रपट करताना खूप विचार करु लागला. २००६ मध्ये ‘कोई मिल गया’ या चित्रपटामुळे त्याला पुन्हा एकदा यश गवसले. त्याने ‘धूम २’, ‘जोधा अकबर’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘क्रिश’, ‘अग्निपथ’, ‘वॉर’ अशा मोजक्या पण दर्जेदार चित्रपटांमध्ये काम केले आहे. २००० मध्ये त्याने सुझान खानशी लग्न केले. त्यांना दोन मुलगे आहेत. नोव्हेंबर २०१४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. हृतिक सध्या सबा आझाद या अभिनेत्रीला डेट करत आहे.Read More
यावर्षीही भारतातील टॉप करदात्यांच्या यादीत अनेक नामवंत स्टार्सचा समावेश आहे. फॉर्च्युन इंडियाने २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी भारतातील सर्वाधिक कर भरणाऱ्या…