हृतिक रोशन News

हृतिक रोशन हा बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता आहे. त्याचा जन्म १० जानेवारी १९७४ रोजी मुंबईमध्ये झाला. त्याचे संपूर्ण नाव हृतिक रोशन नागरथ असे आहे. त्याचे संपूर्ण कुटुंब चित्रपट व्यवसायामध्ये कार्यरत आहे. त्याने माहीमच्या बॉम्बे स्कॉटिश स्कूल या शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे. शाळेत डाव्या हातामध्ये असलेल्या अतिरिक्त अंगठ्यामुळे त्याला चिडवले जात आहे. यामुळे तो शाळेत जाणे टाळायचा. वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत तो बोलताना अडखळायचा. हळूहळू त्याने या समस्यांवर मात केली. याच सुमारास हृतिकने त्याच्या आजोबांच्या म्हणजेच ओम प्रकाश यांच्या ‘आशा’ या चित्रपटाद्वारे बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केले. १९८० पासून त्याचा बॉलिवूडमधील प्रवास सुरु झाला. कॉलेजमध्ये असताना हृतिकने त्याच्या वडिलांच्या (राकेश रोशन) करन-अर्जुन, कोयला अशा काही चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शन केले. २००० मध्ये राकेश रोशन यांनी हृतिक आणि अमीशा पटेल ही फ्रेश जोडी घेऊन ‘कहो ना प्यार है’ हा चित्रपट बनवला. या चित्रपटामुळे हृतिक रातोरात स्टार झाला. त्याच्या या चित्रपटाने अनेक विक्रम मोडत इतिहास रचला. ‘कहो ना प्यार है’ च्या यशानंतर त्याला निर्मात्यांच्या ऑफर्स येऊ लागल्या. पुढील काही वर्षांमध्ये प्रदर्शित झालेले त्याचे चित्रपट फ्लॉप झाले. चुकीची संहिता निवडल्याने चित्रपट फ्लॉप असल्याचे त्याच्या लक्षात आल्याने तो चित्रपट करताना खूप विचार करु लागला. २००६ मध्ये ‘कोई मिल गया’ या चित्रपटामुळे त्याला पुन्हा एकदा यश गवसले. त्याने ‘धूम २’, ‘जोधा अकबर’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘क्रिश’, ‘अग्निपथ’, ‘वॉर’ अशा मोजक्या पण दर्जेदार चित्रपटांमध्ये काम केले आहे. २००० मध्ये त्याने सुझान खानशी लग्न केले. त्यांना दोन मुलगे आहेत. नोव्हेंबर २०१४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. हृतिक सध्या सबा आझाद या अभिनेत्रीला डेट करत आहे.Read More
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”

Hrithik Roshan: अंडरवर्ल्डला वाटत होते हृतिक रोशनने त्यांच्यासाठी चित्रपट करावा; राकेश रोशन खुलासा करताना म्हणाले, “मी त्यांना असे संकेत…”

rakesh roshan on krrish 4
‘क्रिश ४’ चित्रपटाबद्दल धक्कादायक माहिती आली समोर, दिग्दर्शक राकेश रोशन यांनी केला खुलासा; म्हणाले, “यापुढे मी…”

Krrish 4 : ज्येष्ठ निर्माते -दिग्दर्शक राकेश रोशन यांनी ‘क्रिश ४’ या सिनेमाबद्दल एका मुलाखतीत एक अपडेट शेअर केली आहे.

sussane khan share photo of son hridaan and hrehaan
हृतिक रोशन-सुझान खानची मुलं झाली मोठी, फोटो पाहून चाहते म्हणाले, “ते बॉलीवूडचे…”

हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खानने इन्स्टाग्रामवर तिच्या मुलांचा एक फोटो शेअर केला आहे.

kaho na pyaar hai hritik roshan movie sets guinness world record
हृतिक रोशनच्या पहिल्याच चित्रपटाची नोंद ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये का झाली होती? ‘हे’ आहे कारण…

हृतिकने ‘कहो ना प्यार है’ चित्रपटातून केलेलं बॉलीवूडमध्ये पदार्पण, या सिनेमाची नोंद ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये का झाली? जाणून घ्या…

hrithik roshan saba azad Sussanne Khan
हृतिक रोशन-सबा आझादच्या नात्याला ३ वर्षे पूर्ण, अभिनेत्याच्या ‘त्या’ पोस्टवर पूर्वाश्रमीची पत्नी कमेंट करत म्हणाली…

हृतिक आणि सबा यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून त्यांच्या नात्याला ३ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

‘हे’ दोन बॉलीवूड सुपरस्टार आहेत डेटिंग अ‍ॅपवर, उर्वशी रौतेलाचा मोठा दावा, एक लोकप्रिय अभिनेत्रीसह आहे नात्यात

अभिनेत्री उर्वशी रौतेलाने ती स्वतः एक डेटिंग अ‍ॅप वापरत असून तिने याच अ‍ॅपवर बॉलीवूडमधील दोन बड्या अभिनेत्यांच प्रोफाईल पाहिल आहे…

shraddha kapoor new house set become akshay kumar neighbour in juhu on rent
कोट्यवधींची मालकीण असून श्रद्धा कपूर राहणार भाड्याने; जुहूमध्ये ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याच्या शेजारी घेणार फ्लॅट

अक्षय कुमार आणि सलमान खानच्या चित्रपटात काम न करण्याबाबत कंगना रणौत स्पष्टीकरण देत म्हणाल्या….

Shraddha Kapoor, Hrithik Roshan, Krrish 4, Shraddha Kapoor Casting Rumors in Krrish 4,
‘स्त्री २’ च्या यशानंतर श्रद्धा कपूरची ‘क्रिश ४’मध्ये वर्णी? महत्त्वाची माहिती आली समोर

गेल्या काही दिवसांपासून ‘क्रिश ४’ सिनेमाची चर्चा आहे. या सिनेमात श्रद्धा कपूर हृतिक रोशनसह मुख्य भूमिकेत असेल, अशी चर्चा होती.