हृतिक रोशन Photos

हृतिक रोशन हा बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता आहे. त्याचा जन्म १० जानेवारी १९७४ रोजी मुंबईमध्ये झाला. त्याचे संपूर्ण नाव हृतिक रोशन नागरथ असे आहे. त्याचे संपूर्ण कुटुंब चित्रपट व्यवसायामध्ये कार्यरत आहे. त्याने माहीमच्या बॉम्बे स्कॉटिश स्कूल या शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे. शाळेत डाव्या हातामध्ये असलेल्या अतिरिक्त अंगठ्यामुळे त्याला चिडवले जात आहे. यामुळे तो शाळेत जाणे टाळायचा. वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत तो बोलताना अडखळायचा. हळूहळू त्याने या समस्यांवर मात केली. याच सुमारास हृतिकने त्याच्या आजोबांच्या म्हणजेच ओम प्रकाश यांच्या ‘आशा’ या चित्रपटाद्वारे बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केले. १९८० पासून त्याचा बॉलिवूडमधील प्रवास सुरु झाला. कॉलेजमध्ये असताना हृतिकने त्याच्या वडिलांच्या (राकेश रोशन) करन-अर्जुन, कोयला अशा काही चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शन केले. २००० मध्ये राकेश रोशन यांनी हृतिक आणि अमीशा पटेल ही फ्रेश जोडी घेऊन ‘कहो ना प्यार है’ हा चित्रपट बनवला. या चित्रपटामुळे हृतिक रातोरात स्टार झाला. त्याच्या या चित्रपटाने अनेक विक्रम मोडत इतिहास रचला. ‘कहो ना प्यार है’ च्या यशानंतर त्याला निर्मात्यांच्या ऑफर्स येऊ लागल्या. पुढील काही वर्षांमध्ये प्रदर्शित झालेले त्याचे चित्रपट फ्लॉप झाले. चुकीची संहिता निवडल्याने चित्रपट फ्लॉप असल्याचे त्याच्या लक्षात आल्याने तो चित्रपट करताना खूप विचार करु लागला. २००६ मध्ये ‘कोई मिल गया’ या चित्रपटामुळे त्याला पुन्हा एकदा यश गवसले. त्याने ‘धूम २’, ‘जोधा अकबर’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘क्रिश’, ‘अग्निपथ’, ‘वॉर’ अशा मोजक्या पण दर्जेदार चित्रपटांमध्ये काम केले आहे. २००० मध्ये त्याने सुझान खानशी लग्न केले. त्यांना दोन मुलगे आहेत. नोव्हेंबर २०१४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. हृतिक सध्या सबा आझाद या अभिनेत्रीला डेट करत आहे.Read More
highest earning indian actors 2024
12 Photos
२०२४ मध्ये बॉलिवूड अभिनेत्यांपेक्षा दाक्षिणात्य अभिनेत्यांची चालती! चित्रपटांनी केली सर्वाधिक कमाई; टॉप १० मध्ये कोणत्या नावांचा समावेश?

highest earning indian actors 2024 : या वर्षीही दाक्षिणात्य कलाकारांनी कमाईच्या बाबतीत बॉलिवूड कलाकारांना मागे टाकले. २०२४ या वर्षच्या यादीत…

These Top 10 celebrities paid the highest tax in 2024
10 Photos
भारतातील सर्वात मोठे करदाते सेलिब्रिटी, २०२३-२४ या आर्थिक वर्षात कोणी भरला सर्वाधिक कर?

यावर्षीही भारतातील टॉप करदात्यांच्या यादीत अनेक नामवंत स्टार्सचा समावेश आहे. फॉर्च्युन इंडियाने २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी भारतातील सर्वाधिक कर भरणाऱ्या…

Bollywood stars with the most extravagant homes
9 Photos
किंग खान, बिग बी, सैफ अली खान ते रणवीर सिंगपर्यंत; कोणाच्या घराची किंमत सर्वाधिक? आकडा पाहून व्हाल थक्क

बॉलिवूड स्टार्सचे आयुष्य नेहमीच चर्चेचा विषय असते. त्यांच्या शानदार अभिनय आणि आलिशान जीवनशैलीशिवाय त्यांची राहती आलिशान घरे देखील अनेकदा चर्चेत…

Hrithik Roshan Social Media
10 Photos
Photos : प्रेयसी सबा आझादवर हृतिक रोशनने केला प्रेमाचा वर्षाव, वाढदिवशी शेअर केले अनसीन फोटो

बॉलिवूडचा हँडसम हंक हृतिक रोशनने त्याची गर्लफ्रेंड सबा आझादला तिच्या ३९ व्या वाढदिवसानिमित्त खास अंदाजात शुभेच्छा दिल्या.

9 actors have played the role of father and son
12 Photos
साऊथपासून बॉलिवूडपर्यंत ‘या’ 9 अभिनेत्यांनी एकाच चित्रपटात पिता-पुत्राची भूमिका साकारली, वाचा कोणते आहेत हे सिनेमे?

एकाच चित्रपटात वडील आणि मुलाच्या दोन्ही भूमिका निभावणारे अभिनेते: बॉलिवूडपासून दक्षिणेपर्यंत असे अनेक अभिनेते आहेत ज्यांनी मोठ्या पडद्यावर एकाच चित्रपटात…

Bollywood stars reaction on Kolkata doctor rape-murder case
11 Photos
“अशा गुन्हेगारांना सर्वांसमोर फासावर लटकवा…”, कोलकाता डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणावर बॉलीवूड स्टार्सच्या प्रतिक्रिया, जाणून घ्या कोण काय म्हणाले?

Bollywood stars reaction on Kolkata doctor rape-murder case: कोलकात्याच्या आरजी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येबद्दल संपूर्ण…

First salary of Bollywood superstars
9 Photos
‘या’ बॉलीवूड स्टार्सचा पहिला पगार पाहून तुमचा विश्वासच बसणार नाही, शाहरुख खानचे मानधन फक्त…

Bollywood superstars first salary: आज बॉलिवूडचे मोठे स्टार प्रत्येक चित्रपटासाठी करोडो रुपये घेत आहेत. या स्टार्सनी आपलं करिअर सुधारण्यासाठी रात्रंदिवस…

Varun Dhawan will shift into the house of this Bollywood superstar
9 Photos
‘या’ बॉलीवूड सुपरस्टारच्या ५० कोटींच्या घरात भाड्याने राहणार वरुण धवन, ‘तो’ आहे ३,१३० कोटींच्या संपत्तीचा मालक

वरुण धवन जे घर भाड्याने घेत आहे ते चित्रपटसृष्टीतील एका सुपरस्टारचे आहे.

Hrithik Roshan | Hrithik Roshan Birthday | Hrithik Roshan Real name
12 Photos
मुंबईत आलिशान घरं अन् लक्झरी गाड्यांचे कलेक्शन; तब्बल ‘इतक्या’ कोटींच्या संपत्तीचा मालक आहे हृतिक रोशन

Hrithik Roshan Birthday : हृतिक रोशनची एकूण संपत्ती आणि मासिक उत्पन्न जाणून तुम्ही थक्क व्हाल.

Krrish to Don 2, Games have been made on these Bollywood films, but could not become hits like films
7 Photos
‘गजनी’ ते ‘क्रिश’, ‘या’ पाच बॉलिवूड चित्रपटांवर बनलेत व्हिडीओ गेम्स, गेमिंगच्या जगात कोणाला मिळाली पसंती?

बॉलिवूड चित्रपटांवर बनवण्यात आलेले बहुतांश व्हिडीओ गेम्स अयशस्वी ठरले आहेत.

hrithik roshan in bhagyshree mote engagement ceremony
12 Photos
Photos : भाग्यश्री मोटेच्या साखरपुडा सोहळ्यात हृतिक रोशनला पाहून चाहत्यांना पडला प्रश्न, जाणून घ्या कारण

भाग्यश्री-विजयच्या साखरपुडा सोहळ्यात बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनही त्याची गर्लफ्रेण्ड सबा आझादसह उपस्थित होता.

ताज्या बातम्या