ऋता दुर्गुळे Photos

ऋता दुर्गुळे (Hruta Durgule) ही सध्याची मराठी चित्रपटसृष्टीमधील (Marathi Movie) आघाडीची अभिनेत्री आहे. तिचा जन्म १२ सप्टेंबर १९९३ रोजी मुंबईमध्ये झाला. माटुंग्यामधील रामनारायण रुईया महाविद्यालयामध्ये तिने शिक्षण पूर्ण केले आहे. कलाविश्वाची आवड असणाऱ्या

ऋताने स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील ‘पुढचं पाऊल’ मालिकेची सहाय्यक दिग्दर्शका म्हणून काम केले. तेव्हा वाहिनीवर सुरु होणाऱ्या नव्या मालिकेसाठी तिने सहज म्हणून ऑडिशन दिली. लगेचच ऋताला ‘दुर्वा’ ही तिची पहिली मालिका मिळाली. या मालिकेमध्ये अनेक दिग्गज कलाकार असून ऋता भाव खाऊन गेली. पुढे तिची ‘फुलपाखरु’ ही मालिका सुरु झाली. या मालिकेतील तिचे ‘वैदेही’ हे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस पडले. ही मालिका तब्बल अडीच वर्ष सुरु होती.

दरम्यानच्या काळात ऋताने ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकात प्रमुख व्यक्तिरेखा साकारली. झी मराठीवरील ‘मन उडू उडू झालंय’ या तिच्या मालिकेला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. २०२२ मध्ये तिचे ‘टाईमपास ३’ आणि ‘अनन्या’ हे चित्रपट प्रदर्शित झाले. याच वर्षी मे महिन्यामध्ये ऋताने दिग्दर्शक प्रतीक शहाशी लग्न केले.
Read More
Hruta Durgule Marathi Actress Hruta Durgule
12 Photos
Photos : सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी नवऱ्याबरोबर दुबईमध्ये पोहोचली ऋता दुर्गुळे, रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल

अभिनेत्री ऋता दुर्गुळे सध्या दुबईमध्ये पतीसह सुट्ट्या एण्जॉय करताना दिसत आहे. यादरम्यानचे काही फोटोही तिने शेअर केले आहेत.