बारावीचा निकाल Photos

इयत्ता बारावी (HSC)हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातला महत्त्वपूर्ण टप्पा असतो. हा टप्पा पार झाल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी मिळते. बारावीच्या परीक्षेवर सर्व विद्यार्थ्यांचे भवितव्य अवलंबून असते. दहावीपर्यंत विद्यार्थ्यांना एकाच पद्धतीने प्राथमिक शिक्षण दिले जाते.


पुढे दहावीनंतर त्यांना आपल्या आवडीनुसार आणि कौशल्यानुसार विज्ञान, वाणिज्य आणि कला या तीन शाखांपैकी एका शाखेची निवड करुन महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागतो. पुढील शिक्षण घेण्याच्या उद्देशाने बरेचसे लोक अकरावी आणि बारावी यांमधील अभ्यासक्रमाचा एकत्र अभ्यास करायला सुरुवात करतात. बारावीची परीक्षा ही प्रामुख्याने दरवर्षी फेब्रुवारी ते मार्च या दरम्यान असते. एचएससीव्यतिरिक्त अन्य बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक वेगवेगळे असते. परीक्षा झाल्यानंतर २ ते ३ महिन्यांमध्ये म्हणजेच साधारण मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर केला जातो. जे विद्यार्थी बारावीच्या परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण होतात. त्यांना झालेली चुक सुधारण्यासाठी संधी दिली जाते. ज्या विषयामध्ये कमी गुण मिळाले आहेत, त्या विषयाची पुन्हा परीक्षा पुन्हा देता येते. फेरपरीक्षा या जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये होतात आणि ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये फेरपरीक्षांचे निकाल देखील लागतात. जेणेकरुन अनुत्तीर्ण विद्यार्थ्याला पुढील वर्गामध्ये जाण्यासाठी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता येईल.


बारावीचा निकाल हा प्रत्येकासाठी महत्त्वपूर्ण क्षण असतो. लोकसत्ता डॉट कॉमच्या या पेज/सदरावर बारावीच्या निकालाबाबतची सविस्तर माहिती पाहायला मिळेल. त्याशिवाय फेरपरीक्षा, त्यांचे निकाल आणि अन्य गोष्टींशी संबंधित बातम्या वाचायला मिळतील.


Read More
16 Photos
Photos : ‘हे’ बॉलिवूड सेलिब्रिटी अभिनयाप्रमाणेच शिक्षणातही आहेत फर्स्ट क्लास; १२वीत मिळाले होते इतके टक्के

बॉलिवूड सेलिब्रिटी बारावीत किती गुण मिळवून उत्तीर्ण झाले होते यावर एक नजर टाकूया.