२००५ मध्ये पुरुषांचा पहिला आंतरराष्ट्रीय टी-२० सामना न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये खेळण्यात आला. तत्पूर्वी इंग्लंडमध्ये देशांतर्गत पद्धतीने कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांपेक्षा कमी षटक असणारे सामने खेळायला सुरुवात झाली होती. २००२ मध्ये शेवटचा बेन्सन आणि हेजेस कप खेळला गेला. त्यानंतर टी-२० सामन्यांची सुरुवात झाली. आयसीसी (International Cricket Council) तर्फ २००७ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर टी-२० विश्वचषक स्पर्धेचे दक्षिण आफ्रिकामध्ये आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन संघांमध्ये रंगला होता. शेवटच्या षटकापर्यंत पोहोचलेल्या या सामन्यामध्ये भारताने विजय मिळवत पहिल्या आंतरराष्ट्रीय टी-२० विश्वचषक मिळवला. दर दोन वर्षांनी आयसीसीद्वारे टी-२० विश्वचषकाचे आयोजन केले जाते. आयसीसीच्या अन्य कार्यक्रमांनुसार त्याच्या वेळापत्रकामध्येही बदल केले जातात. २०२२ चा टी-२० विश्वचषक इंग्लंडच्या संघाने जिंकला. पुढच्या वर्षी जून २०२४ मध्ये आयसीसी टी-२० विश्वचषक आयोजित केला जाणार आहे. Read More
T20 Women’s World Cup 2024: बांगलादेशातील हिंसक आंदोलनादरम्यान पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडला आहे. बांगलादेशातील बिघडलेल्या परिस्थितीमध्ये महिला टी-२०…