आयसीसी विश्वचषक २०२३ News
५ ऑक्टोबरपासून भारतामध्ये एकदिवसीय विश्वचषक २०२३(ICC World Cup) ची सुरुवात झाली. दर चार वर्षांनी क्रिकेटच्या या महास्पर्धेचे आयोजन केले जाते. २०१९ मध्ये विश्वचषक स्पर्धेच्या यजमानपदाची धुरा इंग्लंडकडे होती. त्यावर्षी इंग्लंडच्या संघाने विश्वचषकावर आपले नाव कोरुन इतिहास रचला. या वर्षी भारतामध्ये विश्वचषक स्पर्धा संपन्न होत आहे. क्रिकेट हा खेळ सध्या जगभरातला सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. युरोपामध्ये क्रिकेटला सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळामध्ये क्रिकेट प्रामुख्याने खेळला जात आहे. तेव्हा फक्त कसोटी सामने खेळवले जात असत.
१९०० मध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होता. त्या सुमारास क्रिकेटला प्रसिद्धी मिळायला सुरुवात झाली. १९१२ मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका अशा तीन देशांनी मिळून कसोटी मालिकेचे आयोजन केले होते. हळूहळू अशा कसोटी सामन्यांचे प्रमाण वाढू लागले. पुढे १९२८ मध्ये वेस्ट इंडिज, १९३० मध्ये न्यूझीलंड, १९३२ मध्ये भारत आणि १९५२ मध्ये पाकिस्तान या देशांनी कसोटी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. दरम्यानच्या काळात १९६० मध्ये इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यांऐवजी कमी ओव्हर्सचे सामने भरवण्यात आले. पुढची काही वर्षे इंग्लिश काउंटी क्रिकेटमध्ये कसोटी सामन्यांच्या तुलनेमध्ये कमी ओव्हर्स असलेले सामने खेळवण्याचे प्रमाण वाढले. या फॉरमॅटमध्ये दोन्ही इनिंग्स एकाच दिवशी पूर्ण होत असतं.
पुढे १९७०-७१ मध्ये एकदिवसीय किक्रेट फॉरमॅटला सुरुवात झाली. त्यानंतर क्रिकेटला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रोत्साहन मिळावे आणि खेळाची वृद्धी व्हावी या उद्देशाने इंग्लंडने पुढाकार घेत १९७५ मध्ये पहिल्या विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले. तेव्हा स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि पूर्व आफ्रिका हे आठ देश सहभागी झाले होते. १९७५ आणि १९७९ या दोन वर्षांमध्ये वेस्ट इंडिजने विश्वचषक जिंकत क्रिकेट जगतामध्ये दबादबा निर्माण केला. पुढे १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्त्वाखाली भारताचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण झाले. त्यानंतरच्या वर्षांमध्ये क्रमवारी ऑस्ट्रेलिया (१९८७), पाकिस्तान (१९९२) आणि श्रीलंका (१९९६) असे विश्वचषकात विजेतेपद राखले. ऑस्ट्रेलियाची विजयाची हॅटट्रिक झाल्यावर २०११ मध्ये भारत दुसऱ्यांदा विश्वचषक विजेता बनला. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने सर्वात जास्त (५ वेळा) एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा जिंकल्या आहेत. भारत आणि वेस्ट इंडिज यांनी दोनदा तर पाकिस्तान, श्रीलंका, इंग्लंड या देशांनी एकदा विश्वचषकावर नाव कोरले आहे. यंदाच्या विश्वचषक २०२३ मध्ये कोण विजेता ठरणार याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आहे.
विशेष बाब म्हणजे पहिल्या तीन विश्वचषकामध्ये (Cricket World Up) प्रत्येक सामना हा ६० षटक म्हणजे ओव्हरचा होता. १९८७ मध्ये ही मर्यादा ५० ओव्हर्स इतकी करण्यात आली. तेव्हा विश्वचषकाच्या चौथ्या हंगामामध्ये सामन्यांमध्ये दोन्ही संघांना ५० षटक क्रिकेटचा खेळ खेळावा लागे. ओव्हर्सप्रमाणे इतर अनेक गोष्टी काळानुरुप बदलत गेल्या आहेत. जुन्या नियमांच्या जागी नवे नियम लागू करण्यात आले आहे.
Read More