आयसीसी विश्वचषक २०२३ Photos

५ ऑक्टोबरपासून भारतामध्ये एकदिवसीय विश्वचषक २०२३(ICC World Cup) ची सुरुवात झाली. दर चार वर्षांनी क्रिकेटच्या या महास्पर्धेचे आयोजन केले जाते. २०१९ मध्ये विश्वचषक स्पर्धेच्या यजमानपदाची धुरा इंग्लंडकडे होती. त्यावर्षी इंग्लंडच्या संघाने विश्वचषकावर आपले नाव कोरुन इतिहास रचला. या वर्षी भारतामध्ये विश्वचषक स्पर्धा संपन्न होत आहे. क्रिकेट हा खेळ सध्या जगभरातला सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. युरोपामध्ये क्रिकेटला सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळामध्ये क्रिकेट प्रामुख्याने खेळला जात आहे. तेव्हा फक्त कसोटी सामने खेळवले जात असत.


१९०० मध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होता. त्या सुमारास क्रिकेटला प्रसिद्धी मिळायला सुरुवात झाली. १९१२ मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका अशा तीन देशांनी मिळून कसोटी मालिकेचे आयोजन केले होते. हळूहळू अशा कसोटी सामन्यांचे प्रमाण वाढू लागले. पुढे १९२८ मध्ये वेस्ट इंडिज, १९३० मध्ये न्यूझीलंड, १९३२ मध्ये भारत आणि १९५२ मध्ये पाकिस्तान या देशांनी कसोटी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. दरम्यानच्या काळात १९६० मध्ये इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यांऐवजी कमी ओव्हर्सचे सामने भरवण्यात आले. पुढची काही वर्षे इंग्लिश काउंटी क्रिकेटमध्ये कसोटी सामन्यांच्या तुलनेमध्ये कमी ओव्हर्स असलेले सामने खेळवण्याचे प्रमाण वाढले. या फॉरमॅटमध्ये दोन्ही इनिंग्स एकाच दिवशी पूर्ण होत असतं.


पुढे १९७०-७१ मध्ये एकदिवसीय किक्रेट फॉरमॅटला सुरुवात झाली. त्यानंतर क्रिकेटला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रोत्साहन मिळावे आणि खेळाची वृद्धी व्हावी या उद्देशाने इंग्लंडने पुढाकार घेत १९७५ मध्ये पहिल्या विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले. तेव्हा स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि पूर्व आफ्रिका हे आठ देश सहभागी झाले होते. १९७५ आणि १९७९ या दोन वर्षांमध्ये वेस्ट इंडिजने विश्वचषक जिंकत क्रिकेट जगतामध्ये दबादबा निर्माण केला. पुढे १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्त्वाखाली भारताचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण झाले. त्यानंतरच्या वर्षांमध्ये क्रमवारी ऑस्ट्रेलिया (१९८७), पाकिस्तान (१९९२) आणि श्रीलंका (१९९६) असे विश्वचषकात विजेतेपद राखले. ऑस्ट्रेलियाची विजयाची हॅटट्रिक झाल्यावर २०११ मध्ये भारत दुसऱ्यांदा विश्वचषक विजेता बनला. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने सर्वात जास्त (५ वेळा) एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा जिंकल्या आहेत. भारत आणि वेस्ट इंडिज यांनी दोनदा तर पाकिस्तान, श्रीलंका, इंग्लंड या देशांनी एकदा विश्वचषकावर नाव कोरले आहे. यंदाच्या विश्वचषक २०२३ मध्ये कोण विजेता ठरणार याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आहे.


विशेष बाब म्हणजे पहिल्या तीन विश्वचषकामध्ये (Cricket World Up) प्रत्येक सामना हा ६० षटक म्हणजे ओव्हरचा होता. १९८७ मध्ये ही मर्यादा ५० ओव्हर्स इतकी करण्यात आली. तेव्हा विश्वचषकाच्या चौथ्या हंगामामध्ये सामन्यांमध्ये दोन्ही संघांना ५० षटक क्रिकेटचा खेळ खेळावा लागे. ओव्हर्सप्रमाणे इतर अनेक गोष्टी काळानुरुप बदलत गेल्या आहेत. जुन्या नियमांच्या जागी नवे नियम लागू करण्यात आले आहे.


Read More
Ind vs AUS Australia Won One Day World Cup 2023 in Marathi
9 Photos
PHOTOS : पाणावलेले डोळे, निराश चेहरे, टीम इंडियाच्या खेळाडूंचे फोटो पाहून, तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

Team India players emotional: नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात विश्वचषकातील अंतिम सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा…

ODI World Cup 2023: Australia hold the trophy
10 Photos
IND vs AUS Final: आयसीसी विश्वचषक अंतिम सामन्यातील ‘हे’ होते महत्त्वाचे क्षण; पाहा हायलाईट्स…

एकदिवसीय विश्वचषक: ट्रॅव्हिस हेडने शतक झळकावल्यामुळे ऑस्ट्रेलियाने 241 धावांचे आव्हान सहा गडी राखून ठेवले.

New Zealand Team Cricketers Wives
11 Photos
PHOTOS: कोण शिक्षक तर कोणी आहे डॉक्टर, जाणून घ्या न्यूझीलंड संघातील क्रिकेटपटूंच्या पत्नी काय करतात?

New Zealand Team Cricketers Wives: न्यूझीलंड संघाने सुरुवातीला चांगली कामगिरी केली, पण नंतर कसेबसे उपांत्य फेरीपर्यंत पोहोचले. त्यानंतर उपांत्य फेरीच्या…

Glenn Maxwell Total Networth Fees And Income Know Everything
8 Photos
World Cup 2023: ग्लेन मॅक्सवेल दरवर्षी कमावतो १८ कोटी रुपये, मॅच फी आणि एकूण संपत्ती किती आहे? जाणून घ्या

Glenn Maxwell Net Worth: ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाचा नियमित भाग असण्याव्यतिरिक्त, ग्ले मॅक्सवेल आयपीएल, बीबीएल सारख्या विविध टी-२० लीगमध्ये देखील…

Aiden Markram Wife Nicole Daniella O Connor Photos
8 Photos
एडन मार्कराम क्रिकेटरच्या मैदानात घालतो धुमाकूळ, अन् पत्नी वाइनची टेस्ट करुन कमावते पैसे, जाणून घ्या कोण आहे?

Aiden Markram love story: निकोल आणि मार्कराम अनेकदा त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. दोघांचे बॉन्डिंग फोटोंमध्ये स्पष्ट दिसत आहे.

prasidh krishna hardik pandya world cup 2023 replacement
1 Photos
Prasidh Krishna: प्रसिध कृष्णाची लेडी लव्ह अमेरिकेत दाखवतेय तिचं कौशल्य, जाणून घ्या कोण आहे?

ICC World Cup 2023: हार्दिक पांड्याला २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर प्रसिध कृष्णाचा संघात समावेश करण्यात आला आहे. प्रसिधची…

IND vs NZ Cricketers Salary
9 Photos
PHOTOS: भारत आणि न्यूझीलंड संघातील खेळाडूंच्या मॅच फीमध्ये किती आहे तफावत? जाणून घ्या

India vs New Zealand Players Match Fee: भारत आणि न्यूझीलंडच्या खेळाडूंच्या पगारात मोठी तफावत आहे. भारतात खेळाडूंना चार श्रेणींमध्ये ठेवले…

Team India reached Pune before the match against Bangladesh got a warm welcome at the airport
12 Photos
Team India: टीम इंडिया पुण्यनगरीत! बांगलादेशला चीत करण्यासाठी रोहित सेना सज्ज, विमानतळावर जल्लोषात स्वागत

World Cup 2023, Team India: पाकिस्तानला चारीमुंड्या चीत करून पुढील सामना खेळण्यासाठी टीम इंडिया पुण्यात पोहोचली आहे. पुण्यानगरीतील विमानतळावर भारतीय…

Cricket World Cup Trophy Price
9 Photos
किती असते क्रिकेट विश्वचषक ट्रॉफीची किंमत? आकडा वाचून व्हाल थक्क

Cricket World Cup Trophy: वर्ल्ड कपची ट्रॉफी मिळविण्यासाठी क्रिकेटचा महासंग्राम सुरु आहे. पण तुम्हाला या विश्वचषक ट्राफीची किंमत किती असते,…

ODI World Cup 2023
12 Photos
बीसीसीआयची क्रिकेट चाहत्यांना मोठी भेट! वर्ल्डकप सामन्याचं सर्वात स्वस्त तिकीट किती रुपयांना? पाहा एका क्लिकवर

जाणून घ्या वर्ल्डकप सामन्याचं सर्वात स्वस्त तिकीट किती रुपयांना आहे…

World Cup 2023
15 Photos
World Cup 2023: वर्ल्डकपनंतर ‘हे’ सहा खेळाडू होणार निवृत्त? ‘या’ तीन भारतीय खेळाडूंची नावे वाचून चाहत्यांना बसेल धक्का

ICC ODI World Cup 2023: वर्ल्डकपमधील दहा संघामध्ये असे सहा दिग्गज खेळाडू आहेत जे वर्ल्डकपनंतर निवृत्ती घेणार असल्याची चर्चा रंगली…