आयसीसी Videos

ICC म्हणजेच International cricket council ही क्रिकेट खेळासाठीची आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संघटना आहे. क्रिकेटचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. या देशाद्वारे जगभरातील देशांमध्ये वसाहती निर्माण करण्यात आल्या होत्या. ब्रिटीशांकडून या वसाहतींमध्ये क्रिकेट खेळ पोहोचला. हळूहळू हा खेळ अनेक देशांमध्ये खेळला जाऊ लागला. देशांतर्गत सामन्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेटचे सामने आयोजित केले जावेत असे तेव्हाच्या दिग्गजांना वाटू लागले. पुढे याच भावनेने प्रेरीत होत १९०९ मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांनी मिळून इंपेरियल क्रिकेट संघटनेची स्थापना केली. तेव्हा ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका देशांमध्ये ब्रिटीशांचे वर्चस्व होते. दुसऱ्या महायुद्धानंतर वसाहती असलेल्या राष्ट्रांना स्वातंत्र्य मिळाले. १९६५ पर्यंत अनेक देशातील क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रिकेटचे सामने खेळू लागले होते. तेव्हा इंपेरियल क्रिकेट संघटनेचे नाव बदलून इंटरनॅशल क्रिकेट कॉन्फरन्स असे ठेवण्यात आले. १९८९ मध्ये या नावात पुन्हा बदल करण्यात आला आणि आयसीसी – इंटरनॅशल क्रिकेट काऊंसिल या नावाचा वापर करण्यात आला. आयसीसीद्वारे क्रिकेट संबंधित सर्व कार्यक्रमांचे, सामन्यांचे आयोजन केले जाते. यामध्ये विश्वचषकाचा देखील समावेश होतो. सध्या आयसीसीचे मुख्यालय दुबईमध्ये आहे. या संघटनेमध्ये १०० पेक्षा जास्त देश सदस्य आहेत. १९२६ मध्ये भारताला आयसीसीचे सदसत्व मिळाले होते.Read More