आयडिया News
आयडिया ही भारतामधील GSM ऑपरेटर कंपनी आहे. या कंपनीचे संपूर्ण नाव आयडिया सेल्यूलर असे आहे. १९९५ मध्ये बिर्ला कम्युनिकेशन लिमिटेड या संस्थेची स्थापना झाली होती. पुढे याचे नाव बदलून आयडिया सेल्यूलर लिमिटेड असे ठेवण्यात आले. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये GSM परवाने मिळवल्यानंतर २००२ मध्ये आयडिया हा ब्रॅंड भारतामध्ये लॉन्च करण्यात आला. तेव्हा या प्रकल्पासाठी ग्रासिम इंडस्ट्रीज, एटी अँड टी कॉर्पोरेशन आणि टाटा समूह एकत्र आले. पुढे २००४ मध्ये एटी अँड टी कॉर्पोरेशन आणि २००६ मध्ये टाटा समूह आयडिया ब्रॅंडमधून बाहेर पडला. त्यानंतर आयडिया सेल्युलर ही आदित्य बिर्ला समूहाची उपकंपनी बनली. सुरुवातीच्या बऱ्याच वर्षांमध्ये या कंपनीला खूप यश मिळाले. आयडियाच्या जाहिरातीदेखील लक्षवेधी ठरत असत. जून २०१८ पर्यंत या कंपनीचे २२०.०० दशलक्ष ग्राहक सदस्य होते. जिओच्या उदयामुळे अन्य टेलिकॉम ऑपरेटर कंपन्याप्रमाणे आयडियाच्या व्यवसायावर देखील मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडला. २०२० मध्ये आयडिया आणि वोडाफोन यांनी मिळून व्ही (Vi) नेटवर्कची स्थापना केली.Read More