मूलभूत हक्कांची संविधानसभेत चर्चा झाली. त्यापूर्वी नेहरू अहवालात मूलभूत हक्कांची मांडणी केलेली होती. त्यानंतर कराची ठरावानेही हक्कांबाबत आग्रही मागणी केली.
संविधानाच्या तिसऱ्या महत्त्वपूर्ण भागात (अनुच्छेद १२ ते ३५) मूलभूत हक्कांचा समावेश आहे. संविधानसभेत सर्वाधिक वाद झाले ते मूलभूत हक्कांच्या स्वरूपाबाबत.