भारत लोकशाही विचारांचा अवलंब करणारा देश आहे. १८३३ मध्ये ब्रिटीश संसदेमध्ये भारत सरकार कायदा संमत झाला. तेव्हा पहिल्यांदा भारत सरकार (Government of India) असा उल्लेख करण्यात आला. आपल्या देशाला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर भारताची राज्यघटना लिहण्यास सुरुवात झाली. हा देश भारतीय राज्यघटनेद्वारे तयार केलेल्या नियमांवर चालतो. सरकारच्या विधिमंडळ, कार्यकारी आणि न्यायपालिका अशा शाखा आहेत. भारत केंद्र सरकार देशाशी संबंधित सर्व निर्णय घेते, तर राज्यांशी संबंधित निर्णय घेण्याची मुभा त्या-त्या राज्यांमधील लोकप्रतिनिधींना असते.
भारत प्रजासत्ताक देश आहे, २९ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांनी देश बनला आहे. निवडणुकांद्वारे राज्यांमध्ये आणि केंद्रामध्ये सरकार स्थापन केले जाते. भारत सरकारमध्ये राष्ट्रपती हे नाममात्र प्रमुख असतात. तर पंतप्रधान त्यांच्या मंत्रीमंडळासह देश चालवतात. जवाहरलाल नेहरु हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. सध्या नरेंद्र मोदी (Narendra Modi ) यांच्याकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी आहे. Read More
भारत-पाकिस्तानमधील शस्त्रविरामाचे स्वागत करणारे आणि काश्मीर संघर्षावर उपाय शोधण्याची ऑफर देणाऱ्या ट्रम्प यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे काश्मीर हा द्विपक्षीय मुद्दा…
India vs Pakistan Tension Raised, Which Airports are Closed: जम्मूमधील अनेक शहरांना लक्ष्य करून गुरुवारी रात्री पाकिस्तानकडून डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांना…
या हल्ल्यात आपल्या प्रियजनांना गमावलेल्यांचे दु:ख प्रत्येक भारतीय माणसाला आपलेच दु:ख वाटते आहे. दहशतवादी हल्ल्याचे फोटो पाहिल्यानंतर प्रत्येक भारतीयाचे रक्त…
१६ एप्रिलला भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नेतृत्वाखालील आणि न्यायमूर्ती पी.व्ही. संयज कुमार आणि के.व्ही. विश्वनाथन यांचा समावेश असलेल्या तीन…