भारतीय नौदल Photos

भारताला ७.५१६.६ किमीचा समुद्रकिनारा लाभला आहे. भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र, पूर्वेला बंगालचा उपसागर आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. त्यामुळे समुद्रमार्गे आपल्या देशावर हल्ला होऊ शकतो. हे हल्ले रोखण्याचे काम भारतीय नौदल करते. भारतीय नौदलाला (Indian Navy) मोठा इतिहास आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांना भारतीय नौदलाचे जनक असे म्हटले जाते. त्यांनी समुद्री आरमार दल स्थापन केले होते. पुढे इ.स. १९३४ मध्ये ब्रिटीशांनी ‘रॉयल इंडियन नेव्ही’ची (आरआयएन) स्थापना केली.स्वातंत्र्यप्राप्तीमध्ये भारतीय नौदलातील सैनिकांनी मोठी कामगिरी बजावली होती. १९७१ मध्ये झालेल्या युद्धामध्ये नौदलाने प्रमुख भूमिका बजावली होती. ४ डिसेंबर रोजी त्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले होते. हा दिवस दरवर्षी नौदल दिवस म्हणून साजरा केला जातो. सध्या अ‍ॅडमिरल आर. हरी कुमार हे नौदलाचे प्रमुख आहेत. भारतीय समुद्री सीमांचे रक्षण करणे हे या दलाचे प्रमुख ध्येय आहे.

भारतीय नौदल (Indian Navy) हे जगातील पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे. नौदलाकडे १५५ युद्धनौका आणि काही पाणबुड्या आहे. तसेच नौदलाच्या हवाई शाखेत शस्त्रसज्ज हेलिकॉप्टर्स व लढाऊ विमानांच्या तुकड्या आहेत.
Read More
pirates captured arrive at Naval Dockyard Mumbai 2
9 Photos
Photo : पायरेट्स ऑफ द अरेबियन! INS नं ३५ समुद्री चाच्यांच्या मुसक्या आवळल्या

भारतीय नौदलाने ३५ समुद्री चाच्यांना जेरबंद केलं होतं. आज आयएनएस कोलकाता ही युद्धनौका या चाच्यांना घेऊन मुंबईत पोहोचली. (Express photo…

Bharat Shakti at Pokharan Pm Narendra Modi
12 Photos
भारताची युद्धसज्जता शत्रूला धडकी भरविणार; ‘भारत शक्ती’बाबत पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

PM Modi at Bharat Shakti : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज राजस्थानच्या पोखरण येथे तीनही सशस्त्र दलांचा युद्धसराव पार…

Indian Navy, MH 60R Seahawk, multi-role helicopter, INS Garuda, Kochi, INAS 334
9 Photos
Photos: नौदलाच्या ताफ्यात अत्याधूनिक MH 60R Seahawk हेलिकॉप्टर दाखल होणार

नौदलाच्या ताफ्यात ताज्या दमाची, अत्याधूनिक तंत्रज्ञान असलेली हेलिकॉप्टर MH 60R Seahawk दाखल होत आहेत. यामुळे नौदलाच्या संचार आणि मारक क्षमतेत…

photo captured by Indian Navy and Coast guard helicopter of Ganesh Immersion at Girgaon Chowpatty
9 Photos
PHOTOS : गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची नौदलाच्या हेलिकॉप्टरमधून टिपलेली खास छायाचित्रे!

गिरगाव चौपाटीवर उंच गणेश मूर्तींचा विसर्जन सोहळा बघण्यासाठी उसळला भक्तांचा जनसागर

5 Photos
Photos : मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज, १४०० किलोच्या तिरंग्याचे खास फोटो

भारतीय नौदलाने मुंबईत ‘नौदल दिना’च्या (४ डिसेंबर) निमित्ताने गेट वे ऑफ इंडियाच्या जवळ नेव्हल डॉकयार्ड येथे जगातील सर्वात मोठ्या राष्ट्रध्वजाचं…

9 Photos
Photos : भारतीय हवाई दलाची ताकद वाढली, तेजस फायटरला ‘हॅमर मिसाईल’ची जोड, काय फायदा होणार? वाचा…

सीमेवर भारताला वारंवार डोळे दाखवणाऱ्या चीनला आता जरब बसणार आहे. कारण भारतीय हवाई दलाची ताकद वाढत आहे. तेजस फायटरला आता…

ताज्या बातम्या