भारतीय नौदल Videos

भारताला ७.५१६.६ किमीचा समुद्रकिनारा लाभला आहे. भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र, पूर्वेला बंगालचा उपसागर आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. त्यामुळे समुद्रमार्गे आपल्या देशावर हल्ला होऊ शकतो. हे हल्ले रोखण्याचे काम भारतीय नौदल करते. भारतीय नौदलाला (Indian Navy) मोठा इतिहास आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांना भारतीय नौदलाचे जनक असे म्हटले जाते. त्यांनी समुद्री आरमार दल स्थापन केले होते. पुढे इ.स. १९३४ मध्ये ब्रिटीशांनी ‘रॉयल इंडियन नेव्ही’ची (आरआयएन) स्थापना केली.स्वातंत्र्यप्राप्तीमध्ये भारतीय नौदलातील सैनिकांनी मोठी कामगिरी बजावली होती. १९७१ मध्ये झालेल्या युद्धामध्ये नौदलाने प्रमुख भूमिका बजावली होती. ४ डिसेंबर रोजी त्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले होते. हा दिवस दरवर्षी नौदल दिवस म्हणून साजरा केला जातो. सध्या अ‍ॅडमिरल आर. हरी कुमार हे नौदलाचे प्रमुख आहेत. भारतीय समुद्री सीमांचे रक्षण करणे हे या दलाचे प्रमुख ध्येय आहे.

भारतीय नौदल (Indian Navy) हे जगातील पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे. नौदलाकडे १५५ युद्धनौका आणि काही पाणबुड्या आहे. तसेच नौदलाच्या हवाई शाखेत शस्त्रसज्ज हेलिकॉप्टर्स व लढाऊ विमानांच्या तुकड्या आहेत.
Read More
goshta asamanyanchi a former navy officer pravin tulpule who became a medical clown to bring smile on the faces of sick childrens
Pravin Tulpule: नौदल ते वैद्यकीय विदूषक; प्रवीण तुळपुळेंचा असामान्य प्रवास | गोष्ट असामान्यांची८५

प्रवीण तुळपुळे या नौदलाच्या माजी अधिकाऱ्यानं नोकरीचा राजीनामा देत २००१ साली वैद्यकीय विदूषक (Medical Clown) होण्याचा निर्णय घेतला. अर्थात या…

Navy Day
नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधुदुर्गात!; शिवरायांच्या पुतळ्याचं केलं अनावरण | Navy Day

नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधुदुर्गात!; शिवरायांच्या पुतळ्याचं केलं अनावरण | Navy Day

ताज्या बातम्या