भारतामध्ये पहिली रेल्वे (Indian Railway) धावल्यानंतर काही वर्षांमध्ये ब्रिटीशांनी देशभरामध्ये त्यांच्या सोयीसाठी रेल्वेचे जाळे पसरले. मे १८३६ मध्ये भारतीय रेल्वेची स्थापना करण्यात आली असे म्हटले जाते. पुढे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९५१ मध्ये या विभागाचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. तेव्हापासून रेल्वे मंत्रालय भारतीय रेल्वे विभागाची जबाबदारी सांभाळत आहे. रेल्वेच्या या जाळ्याची एकूण लांबी ६७,४१५ कि.मी. इतकी आहे. जगातील चौथी सर्वांत मोठ्या रेल्वेसेवा असलेल्या भारतीय रेल्वेची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे.
या विभागाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. अश्विनी वैष्णव हे भारताचे रेल्वे मंत्री आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प २०२३-२४ सादर करताना रेल्वे विभागाच्या भांडवली खर्चासाठी एकूण २.४० लाख कोटी रुपये राखून ठेवले असल्याचे सांगण्यात आले. तेरा लाखांपेक्षा जास्त कर्मचारी रेल्वे विभागामध्ये कार्यरत आहेत.Read More
मध्य रेल्वेच्या पाच विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वे पोलीस आणि इतर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत जानेवारी ते…