भारतीय रिपब्लिकन पार्टी Photos

भारतीय रिपब्लिकन पक्ष किंवा भारिप (Republican Party of India) हा भारतातील राजकीय पक्ष आहे. या पक्षाचे सध्या अनेक गट आहेत. ज्यात रामदास आठवले (Ramdas Athawale) व प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचे भारिप (आ) व भारिप बहुजन महासंघ हे गट प्रमुख आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी “शेड्युल्ड कास्ट फेडरेशन” बरखास्त करून “भारतीय रिपब्लिकन पक्ष” स्थापन करण्याची घोषणा १९५६ मध्ये केली होती, परंतु पक्ष स्थापन करण्यापूर्वीच ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे निधन झाले.

त्यानंतर त्यांच्या अनुयायी व कार्यकर्त्यांनी पक्ष स्थापन करण्याची योजना आखली. पक्ष स्थापन करण्यासाठी १ ऑक्टोबर १९५७ रोजी नागपूर येथे अध्यक्षीय मंडळाची बैठक झाली. या बैठकीत एन. शिवराज, यशवंत आंबेडकर, पी.टी. बोराळे, ए.जी. पवार, दत्ता कट्टी, दा.ता. रुपवते हे हजर होते. तिसऱ्या दिवशी ३ ऑक्टोबर १९५७ रोजी भारतीय रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली. एन. शिवराज यांची पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. रिपब्लिकन पक्षाचे १९५९ पर्यंतचे मजबुत संघटन फार काळ टिकले नाही.

सर्वप्रथम भारतीय रिपब्लिकन पक्षाचा उदय झाला व नंतर बहुजन महासंघ उदयास आला. या दोन्हीही संघटनांचा उदय व विकास ॲंड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झाला आहे.
Read More
Ramdas Athawale with Family in Bangkok
11 Photos
Photo : ‘मी खातो बँकॉकचा वारा..’, रामदास आठवले यांची ‘बँकॉक’वारी

रिपाइं (आ)चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नुकताच बँकॉक दौरा केला. याचे काही फोटो त्यांनी…

ताज्या बातम्या