इंदुरीकर महाराज

किर्तनाच्या आगळ्या-वेगळ्या शैलीसाठी इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) प्रसिद्ध आहेत. त्यांचे संपूर्ण नाव निवृत्ती काशिनाथ देशमुख असे आहे. त्यांचा जन्म ९ जानेवारी १९७२ रोजी इंदोरी या अहमदनगरमधील गावामध्ये झाला. गावावरुन त्यांचे आडनाव इंदोरीकर पडले. पुढे इंदोरी या शब्दाचा अपभ्रंश होत ते इंदुरी असे झाले. त्यांचे कुटुंबीय वारकरी संप्रदायाच्या विचारांचे होते. कुटुंबातील अनेक सदस्य भजन-किर्तन करत असत. त्याचा प्रभाव इंदुरीकर महाराजांवर झाला. शिक्षण घेत असताना त्यांनी किर्तन करायला सुरुवात केली. आजच्या काळाशी संबंध असणाऱ्या उदाहरणांचा वापर करत असल्यामुळे आणि किर्तनामध्ये नवा प्रयोग केल्याने त्यांचे किर्तन ऐकण्यासाठी लोक गर्दी करत २००३ मध्ये त्यांच्या किर्तनाची पहिली कसेट निघाली.

सोशल मीडियाच्या (Social Media) उदयानंतर त्यांच्या प्रसिद्धीमध्ये वाढ झाली. त्यांचे किर्तनाचे व्हिडीओ व्हायरल होऊ लागले. दरम्यान काही वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते चर्चेत होते. ते सर्वाधिक मानधन घेणाऱ्या किर्तनाकारांपैकी एक आहेत असे म्हटले जाते. त्यांच्या पत्नी शालिनीताई इंदुरीकर देखील किर्तन करतात.
Read More
Indurikar Maharaj
“मी खरं बोलतो अन् त्याची फळं भोगतो”, इंदुरीकर महाराजांचा रोख नेमका कोणावर?

“संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही आणि आली तर तो माणूस देव झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे ज्याला देव व्हायचं…

Indorikar Maharaj Gets Bail
सुनावणीच्या एक दिवस आधीच इंदोरीकर महाराज कोर्टात उपस्थित, मोठी बातमी आली समोर

प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज आज स्वतःच कोर्टात हजर झाले आणि त्यांनी त्यांची भूमिका मांडली

Leopard enters Indurikar Maharaj Home premises Video viral on social media
Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराजांच्या घरात शिरला बिबट्या; दबक्या पावलांनी आला अन्…पाहा VIDEO

Leopard in Indurikar Maharaj House: इंदुरीकर महाराजांच्या घरच्या व्हरांड्यात ‘तो’ दबक्या पावलांनी आला, अन्…

nivrutti-maharaj-indurikar 4
रजत नगरीत खामगाव महोत्सवाचे आयोजन, इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाने प्रारंभ

खामगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर यंदा प्रथमच खामगाव महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाला आज सोमवारी संध्याकाळी आयोजित निवृत्ती…

indurikar maharaj case in the lower court
इंदुरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ; गुन्ह्याची सुनावणी घेण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश 

अवैज्ञानिक आणि वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी इंदुरीकर महाराज वारंवार अडचणीत आले आहेत.

Indurikar-Maharaj
27 Photos
इंदुरीकर महाराजांना २ वर्षांचा तुरुंगवास, माफीनामा आणि…; अंनिसने नेमकं काय म्हटलं? वाचा…

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील आणि ॲड. रंजना गवांदे यांनी मंगळवारी (२० जून) पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत इंदुरीकर…

ANIS Avinash Patil Indurikar Maharaj
VIDEO: “इंदुरीकरांना दोन वर्षे सश्रम तुरुंगवासाची शिक्षा…”, लिंगभेद वक्तव्याप्रकरणी अंनिसचा हल्लाबोल

प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराजांनी लिंगनिदान दाव्यासंबंधी अशास्त्रीय व बेकायदेशीर वक्तव्य केल्याप्रकरणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मोठी…

indurikar maharaj
पुणे : इंदुरीकर महाराजांवरील खटला सुरू ठेवण्यासाठी महाराष्ट्र अंनिसतर्फे कॅव्हेट

इंदुरीकर महाराज यांना त्यांच्या मागणीनुसार पुढील अपील करण्यासाठी उच्च न्यायालयाने चार आठवड्यांची मुदत दिलेली आहे.

nivrutti-maharaj-deshmukh
इंदुरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ, ‘या’ प्रकरणी औरंगाबाद खंडपीठाचे गुन्हा दाखल करण्याचे निर्देश

प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. औरंगाबाद खंडपीठाने इंदुरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे…

indurikar maharaj gautami patil
“तिला तीन गाण्यांसाठी काही लाख अन् आम्हाला टाळ वाजवून…” इंदुरीकर महाराजांची गौतमी पाटीलवर अप्रत्यक्ष टीका

गौतमी कार्यक्रमांसाठी मानधन लाखांमध्ये घेते. याच मुद्द्यावरून निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज यांनी गौतमीवर टीका केली आहे.

संबंधित बातम्या