इंदुरीकर महाराज Videos

किर्तनाच्या आगळ्या-वेगळ्या शैलीसाठी इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) प्रसिद्ध आहेत. त्यांचे संपूर्ण नाव निवृत्ती काशिनाथ देशमुख असे आहे. त्यांचा जन्म ९ जानेवारी १९७२ रोजी इंदोरी या अहमदनगरमधील गावामध्ये झाला. गावावरुन त्यांचे आडनाव इंदोरीकर पडले. पुढे इंदोरी या शब्दाचा अपभ्रंश होत ते इंदुरी असे झाले. त्यांचे कुटुंबीय वारकरी संप्रदायाच्या विचारांचे होते. कुटुंबातील अनेक सदस्य भजन-किर्तन करत असत. त्याचा प्रभाव इंदुरीकर महाराजांवर झाला. शिक्षण घेत असताना त्यांनी किर्तन करायला सुरुवात केली. आजच्या काळाशी संबंध असणाऱ्या उदाहरणांचा वापर करत असल्यामुळे आणि किर्तनामध्ये नवा प्रयोग केल्याने त्यांचे किर्तन ऐकण्यासाठी लोक गर्दी करत २००३ मध्ये त्यांच्या किर्तनाची पहिली कसेट निघाली.

सोशल मीडियाच्या (Social Media) उदयानंतर त्यांच्या प्रसिद्धीमध्ये वाढ झाली. त्यांचे किर्तनाचे व्हिडीओ व्हायरल होऊ लागले. दरम्यान काही वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते चर्चेत होते. ते सर्वाधिक मानधन घेणाऱ्या किर्तनाकारांपैकी एक आहेत असे म्हटले जाते. त्यांच्या पत्नी शालिनीताई इंदुरीकर देखील किर्तन करतात.
Read More

ताज्या बातम्या