IPL (Indian Premier League) ही भारतामधील सर्वात मोठी टी-२० फ्रेंचायझी क्रिकेट लीग आहे. २००८ साली आयपीएलची सुरुवात झाली. बीसीसीआय (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) यांच्याद्वारे दरवर्षी आयपीएलचे आयोजन करण्यात येते. ब्रिजेश पटेल हे आयपीएलचे अध्यक्ष, तर जय शाह हे सचिव आहेत. यंदाच्या वर्षी आयपीएलचे १६ वे पर्व असणार आहे. आयपीएलची संकल्पना बीसीसीआयचे माजी उपाध्यक्ष ललित मोदी यांची होती असे म्हटले जाते. २००७ मध्ये भारताने आयसीसी टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर सर्वत्र टी-२० सामन्यांचे वारे वाहू लागले. तेव्हा झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेसद्वारे इंडियन क्रिकेट लीग (ICL) ची घोषणा करण्यात आली. याला आयसीसी आणि बीसीसीआयची परवानगी नव्हती. क्रिकेटपटूंनी आयसीएलमध्ये खेळू नये यासाठी बीसीसीआयने त्यांच्यावर अनेक निर्बंध लादले.
पुढे त्यांनी आयसीएलला पर्याय म्हणून आयपीएलची स्थापना केली असे म्हटले जाते. आयपीएलच्या पहिल्या हंगामामध्ये शेन वॉर्न यांच्या नेतृत्त्वाखाली राजस्थान रॉयल्सने विजेतेपद पटकावले होते. मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहे. या संघाने ५ वेळा आयपीएलचे चषक मिळवले आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी हा आयपीएलमध्ये सर्वाधिक सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवणारा एकमेव खेळाडू आहे. गतवर्षी आयपीएलमध्ये गुजरात आणि लखनऊ या दोन संघांचा समावेश करण्यात आला. त्यातील गुजरात टायटन्स या संघाने २०२२चे आयपीएल चषकावर आपले नाव कोरले. लवकरच २०२३ मधील आयपीएलला सुरुवात होणार आहे.Read More
Venkatesh Iyer Interview: कोलकाता नाइट रायडर्सचा स्टार अष्टपैलू खेळाडू व्यंकटेश अय्यर याने एका मुलाखतीत त्याच्या शिक्षणाबद्दल सांगितले आहे आणि आयपीएलबाबतही…