आयपीएल म्हणजेच इंडियन प्रीमिअर लीग ही जगातील सर्वात मोठी फ्रेंचायझी क्रिकेट लीग आहे. या लीगमध्ये गेल्या वर्षी गुजरात आणि लखनऊ असे दोन संघ सहभागी केल्याने आयपीएलमधील एकूण संघाची संख्या १० झाली आहे. आयपीएलची सुरुवात २००८ मध्ये झाली होती. तेव्हा पहिल्यांदा आयपीएल ऑक्शन करण्यात आले होते. ठराविक कालावधीनंतर आयपीएल ऑक्शनचे आयोजन बीसीसीआयद्वारे केले जाते. या लिलावामध्ये ही लीग खेळण्याची इच्छा असणारे क्रिकेटपटू एकत्र येतात. याची सविस्तर यादी तयार केली जाते. या खेळाडूंची माहिती संघाना देण्यात येते. काही संघ आधीपासूनच राज्यस्तरीय, देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूंवर लक्ष ठेवून असतात. आयपीएलच्या नियमांनुसार, एका विशिष्ट दिवशी ऑक्शन ठेवले जाते. काही वेळेस हा कार्यक्रम दोन दिवसांमध्ये विभागला जातो. ऑक्शनमध्ये आयपीएलमधील संघ क्रिकेटपटूंवर बोली लावत त्यांना आपल्या संघामध्ये सामील करतात. आयपीएल २०२३ साठी डिसेंबर महिन्यामध्ये ऑक्शन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या ऑक्शनमध्ये इंग्लंडच्या सॅम करनवर सर्वाधिक बोली लावण्यात आली. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक १८.५० कोटी एवढी रक्कम मोजत पंजाब किंग्सच्या संघाने आपल्या ताफ्यात सॅमला सामील करुन घेतले. पुढील आयपीएल ऑक्शन डिसेंबर २०२३ मध्ये होणार आहे. Read More