आयपीएल मॉमेंट्स Videos

२००८ मध्ये आयपीएल म्हणजेच इंडियन प्रीमिअर लीगची (IPL) सुरुवात झाली. पहिल्या हंगामापासूनच या टी-२० क्रिकेट लीगची क्रेझ भारतासह जगभरामध्ये पाहायला मिळत आहे. आयपीएल हे भारतीयांसाठी मनोरंजनाच्या मुख्य साधनांपैकी एक बनले आहे.

या क्रिकेट लीगच्या एकूण पंधरा वर्षांमध्ये अनेक बदल झाले आहेत. नियम, अटी यांच्यापासून ते संघातील खेळाडू अशा बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. आयपीएल टी-२० लीगमध्ये अनेक रोमांचक सामने खेळले गेले आहेत. असंख्य खेळाडूंनी चांगली कामगिरी करत चाहत्यांचे मन जिंकले आहे. बऱ्याच जणांनी विविध विक्रम प्रस्थापित केले आहेत. यामध्ये सर्वाधिक धावा करणारे, सर्वाधिक बळी घेणारे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशा साऱ्यांचा समावेश होतो. काही दिवसाताच या लीगच्या सोळाव्या हंगामाची सुरुवात होणार आहे.

नव्या हंगामामध्ये नव्या खेळाडूसह नवीन सामने अनुभवताना जुन्या पण ऐतिहासिक सामन्यांचा फील तुम्हाला लोकसत्ता ऑनलाइनच्या आयपीएल मॉमेंट्स (IPL Moments) येणार आहे. या सदरामध्ये इंडियन प्रीमिअर लीगच्या पूर्वीच्या हंगामांची सफर घडवून दिली जाणार आहे. यात खेळाडूंची सर्वात्तम कामगिरी, थरारक सुपर ओव्हर्स असलेले सामने, चाहत्यांच्या प्रतिक्रिया, क्रिकेटपटूंनी विस्थापित केलेले विक्रम यांसारख्या मॉमेंट्सचा समावेश असणार आहे.
Read More