इशान किशन News
इशान किशन (Ishan Kishan) हा भारतीय फलंदाज आहे. फलंदाजी करण्यासह तो यष्टीरक्षण देखील करतो. मार्च २०२१ मध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध सामन्यामध्ये खेळत आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट खेळायला सुरुवात केली. तो झारखंडकडून राज्यस्तरीय क्रिकेटचे सामने खेळतो. २०१६ मध्ये झालेल्या अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेसाठी पाठवण्यात आलेल्या भारतीय संघाचा इशान किशन कर्णधार होता.
मार्च २०२१ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले. पुढे जुलै २०२१ मध्ये त्याला एकदिवसीय सामने खेळायला सुरुवात केली. डिसेंबर २०२२ मध्ये त्याने बांगलादेश विरुद्धच्या सामन्यामध्ये १३१ चेंडूंमध्ये २१० धावा केल्या. या विक्रमामुळे तो प्रकाशझोतात आला. एकदिवसीय द्विशतक झळकावणारा इशान सर्वात तरुण आणि सर्वात वेगवान क्रिकेटपटू आहे. २०१६ मध्ये त्याच्या आयपीएलच्या प्रवासाला सुरुवात झाली. तेव्हा तो गुजरात लायन्समध्ये होता.
२०१८ मध्ये झालेल्या लिलावात मुंबई इंडियन्सने त्याच्यावर बोली लावली. त्यावर्षापासून इशान मुंबईच्या संघाचा अविभाज्य घटक बनला. आयपीएल २०२२ ऑक्शनमध्ये त्याच्यावर १५.२५ कोटी रुपये इतकी बोली लावली गेली. तो या हंगामातील सर्वाधिक बोली लागलेला खेळाडू ठरला.
Read More