भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organization) ज्याला इस्रो (ISRO) असेही संबोधले जाते. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची स्थापना १५ ऑगस्ट १९६९ रोजी करण्यात आली होती. अंतराळ संशोधन क्षेत्रामध्ये मोलाची कामगिरी बजावणाऱ्या अग्रगण्य संस्थापैकी एक आहे. अवकाश तंत्रज्ञानाचा विकास करणे आणि राष्ट्राच्या हितासाठी त्याचा उपयोग करणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ‘इस्रो’ने अनके उल्लेखनीय कामगिरी केल्या आहेत.
इस्त्रोचे चांद्रयान-३ (Chandrayaan 3) चे ‘विक्रम’ लँडर २३ ऑगस्टला अलगदपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले भारताने नवा इतिहास घडवला होता. चांद्रयान-३ च्या यशानंतर इस्त्रोने आता सूर्याचा अभ्यास करणार आहे. यासाठी इस्त्रो अंतराळात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एका खास मोहिमेला सुरुवात करणार आहे. या मोहिमेंतर्गत ‘आदित्य एल-१’ (Aditya L1) हे यान अवकाशात पाठवण्यात येणार असून ते सूर्याचा अभ्यास करणार आहे. ISRO च्या नवनवीन कामगिरींबाबत जाणून घेण्यासाठी हे पेज नक्की तपासून पाहाRead More
नियोजित कक्षेत दाखल करण्यात आलेले दोन उपग्रह ‘इस्रो’च्या सहाय्याने खासगी क्षेत्रात बनविण्यात आलेले पहिलेवहिले उपग्रह आहेत. ‘एसडीएक्स-०१’ आणि ‘एसडीएक्स-०२’ अशी…