जॅकलिन फर्नांडिस Videos

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ती मुळची श्रीलंकन आहे. ‘मिस श्रीलंका २००६’चा खिताब नावावर केल्यानंतर जॅकलिनने मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं. सुरुवातीला तिने ‘लंका बिझनेस रिपोर्ट’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी मुंबईत आलेल्या जॅकलिनला बॉलिवूड चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. २००९ साली तिने दिग्दर्शक सुजोय घोष यांच्या ‘अलादिन’ चित्रपटातून ब़ॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तिने अमिताभ बच्चन, संजय दत्त व रितेश देशमुख यांच्यासह स्क्रीन शेअर केली होती. पहिल्याच चित्रपटामुळे जॅकलिन प्रसिद्धीझोतात आली. त्यानंतर तिने ‘जाने कहाँ से आयी है’, ‘हाऊसफूल’, ‘राम सेतू’, ‘किक’, ‘जुडवा २’, ‘मर्डर २’, ‘रेस ३’, ‘बच्चन पांडे’ यांसारख्या चित्रपटातून अभिनयाचा ठसा उमटवला. २०० कोटी मनी लॉड्रिंग घोटाळा प्रकरणात तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरबरोबर जॅकलिनचे प्रेमसंबंध होते.Read More