जालना जिल्हा (Jalna District) हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या मध्यभागी आहे. मराठवाडा विभागात तो उत्तर दिशेस येतो. जालना जिल्हा हा पूर्वी निजामाच्या राज्याचा भाग होता. नंतर हैदराबाद मुक्तिसंग्रामानंतर जालना औरंगाबाद जिल्ह्यामधील तालुका झाला. मग १ मे १९८१ रोजी जालना ‘जिल्हा’ म्हणून नावारूपास आला. जालना जिल्ह्याचे मुख्यालय जालना शहर असून ते महाराष्ट्र राज्याच्या व भारताच्या राजधानीशी ब्रॉडगेज रेल्वे लाईनने जोडलेले आहे.
जालना जिल्हा (Jalna District) हा हायब्रीड सीड्ससाठी प्रसिद्ध असून स्टील रिरोलिंग मिल, विडी उद्योग, शेतीवर आधारित उद्योगधंदे उदा. दाल मिल, बी-बियाणे, तसेच मोसंबीसाठी देखील प्रसिद्ध आहे. जालना जिल्ह्यातील जनतेने मराठवाडा मुक्ती संग्रामात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.Read More
पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटातच प्रश्नपत्रिका बाहेर आली. त्यानंतर उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रत काढून विद्यार्थ्यांना पुरवल्या गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर…
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज जालन्यात आहेत. अजित पवार यांच्या उपस्थितीत काँग्रेसमधील काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश होत…
विविध गुन्ह्यांचे आरोप असलेल्या अंबड तालुक्यातील सात आणि घनसावंगी तालुक्यातील दोन, अशा नऊ जणांवर उपविभागीय अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातून तडीपारीची कारवाई केली.