अभिनेत्री जान्हवी कपूर ही चित्रपट निर्माते बोनी कपूर व दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मोठी मुलगी आहे. ती अभिनेते संजय कपूर व अनिल कपूर यांची पुतणी आहे. तिला खुशी कपूर नावाची लहान बहीण असून अर्जुन कपूर व अंशुला कपूर हे तिचे सावत्र भावंड आहेत. ६ मार्च १९९७ रोजी जन्मलेल्या जान्हवीने मुंबईतील इकोले मोंडियाल वर्ल्ड स्कूलमध्ये शिक्षण घेतलं. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी तिने कॅलिफोर्नियातील ली स्ट्रासबर्ग थिएटर आणि फिल्म इन्स्टिट्यूटमधून अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं. तिने २०१८मध्ये सैराटचा हिंदी रिमेक धडक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तिच्याबरोबर इशान खट्टर मुख्य भूमिकेत होता. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. जान्हवीने घोस्ट स्टोरीज, गुंजन सक्सेना द कारगिल गर्ल, रूही, गूड लक जेरी आणि मिली या चित्रपटांमध्ये काम केले आहे. Read More