जेसन रॉय Photos

जेसन रॉय (Jason Roy) हा इंग्लंडच्या क्रिकेटच्या संघातील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहे. तो सलामीवीर फलंदाज म्हणून इंग्लंडकडून खेळतो. एकदिवसीय आणि टी-२० या फॉरमॅट्समधील अनेक सामन्यांमध्ये त्याने सलामीला उतरत चांगला खेळ करुन दाखवला आहे.


 


इंग्लंडकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये त्याचा समावेश होतो. परिस्थितीनुसार आपला खेळ बदल्यामध्ये पटाईत असल्याने जेसन रॉयचे संघातील स्थान टिकून आहे. २०१४ मध्या जेसन रॉयने इंग्लंडच्या संघामध्ये पदार्पण केले होते. ७ सप्टेंबर २०१४ रोजी पार पडलेला भारत विरुद्ध इंग्लंडचा टी-२० सामना हा त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना होता. त्यानंतर वर्षभरातच त्याला एकदिवसीय संघामध्ये समाविष्ट करण्यात आले. पुढे तो कसोटी संघातही सामील झाला.


 


२०१९ मध्ये एकदिवसीय विश्वचषकात (World Cup 2023) इंग्लंडच्या संघाला (Team England)  विजेतेपद मिळवून देण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता. तो उत्तम क्षेत्ररक्षण देखील आहे. यंदाच्या विश्वचषकामध्येही त्याच्याकडून संघाला अपेक्षा आहे.


Read More