Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

जयदेव उनाडकट Videos

जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat) हा भारतीय क्रिकेटपटू (गोलंदाज) आहे. त्याचा जन्म १८ ऑक्टोबर १९९१ रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. २०१० च्या अंडर-१९ क्रिकेट विश्वचषकामध्ये भारतीय संघामध्ये त्याचा समावेश करण्यात आला होता. तेव्हापासून आत्तापर्यंत उनाडकट हा देशांतर्गत स्तरावर सौराष्ट्रच्या संघाचे प्रतिनिधित्त्व करतो आहे. रणजी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी, देवधर ट्रॉफीसह अन्य काही स्पर्धांही तो खेळला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळण्याचा अनुभवही त्याच्यापाशी आहे. २०१९ मध्ये जयदेव उनाडकटवर राजस्थान रॉयल्सच्या संघाने सर्वाधिक ८.४ कोटी रुपयांची बोली लावली होती. या प्रकरणामुळे तो प्रकाशझोतात आला होता.


२०१० च्या अंडर-१९ विश्वचषकामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याने जयदेव उनाडकटने सर्वांचे लक्ष वेधले होते. वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यामध्ये त्याने १३ गडी बाद केले होते. भारताच्या श्रीलंका दौऱ्यामध्ये त्याचा समावेश नेट बॉलर म्हणून करण्यात आला होता. पुढे डिसेंबर २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाविरुद्ध कसोटी सामन्यामध्ये त्याला खेळण्याची संधी देण्यात आली. जयदेव उनाडकटसाठी हा त्याचा पदार्पणाचा सामना होता. पण दुर्देवाने त्याला पुढील ११-१२ वर्षांमध्ये कसोटी संघामध्ये सहभागी करण्यात आले नव्हते. २२ डिसेंबर २०२२ मध्ये बांगलादेश विरुद्ध भारत हा त्याच्या आयुष्यातला दुसरा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना ठरला. २०१३ मध्ये त्याने एकदिवसीय फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. तसेच २०१६-२०१८ या काळात तो भारताकडून टी-२० सामने खेळला.


इंडियन प्रीमियर लीग (IPL) म्हणजेच आयपीएलमध्ये जयदेव २०१० पासून खेळत आहे. २०१०-२०१२ मध्ये तो केकेआरमध्ये होता. २०१३ मध्ये रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरुच्या संघामध्ये (RCB) त्याला सामील करण्यात आले. पुढे तो बंगळुरु, दिल्ली आणि पुणे संघामध्ये होता. २०१९ च्या आयपीएल लिलावामध्ये राजस्थान व अन्य दोन संघ जयदेव उनाडकटवर नजर ठेवून होते. तेव्हा राजस्थानने सर्वात जास्त बोली लावून जयदेव उनाडकटला आपल्या चमूमध्ये घेतले. २०२१ पर्यंत तो राजस्थान रॉयल्समध्येच होता. पुढे २०२२ मध्ये तो मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये सामने खेळला. सध्या तो लखनौच्या संघामध्ये आहे.


Read More