जोफ्रा आर्चर (Jofra Archer) हा इंग्लंडच्या क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज आहे. त्याचा जन्म बार्बाडोसमध्ये झाला. त्याचे वडील ब्रिटीश आहेत. २०१५ मध्ये जोफ्राने वडिलांच्या मदतीने ब्रिटीश नागरिकत्त्व मिळवलं. त्याला लहानपणापासून क्रिकेटचे वेड आहे. याच वेडापायी तो इंग्लंडला वास्तव्याला आला. लगेचच २०१६ मध्ये जोफ्राने कंट्री क्रिकेट खेळायला सुरुवात केली. टी-२० फॉरमॅटमध्ये त्याला अधिक यश मिळाले. बिग बॉश, आयपीएलसह अनेक फेन्चायझी क्रिकेट लीग्समध्ये खेळण्याचा त्याच्याकडे अनुभव आहे. मे २०१९ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर टी-२० आणि एकदिवसीय फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. पुढे ऑगस्ट २०१९ मध्ये तो इंग्लंडच्या कसोटी संघाचा सदस्य बनला. त्याआधी २०१८ मध्ये तो आयपीएलमध्ये सहभागी झाला. उत्कृष्ट खेळ पाहून राजस्थान रॉयल्सने त्याला आपल्या संघात सामील केले. या संघाच्या गोलंदाजी विभागाची जबाबदारी त्याने पेलावली.
२०२० पर्यंत तो राजस्थान रॉयल्सचा सर्वात मौल्यवान खेळाडू बनला. पुढे २०२२ च्या मेगा ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने त्याच्यावर सर्वाधिक बोली लावली. पण दुखापतीच्या कारणामुळे त्याला या हंगामातील एकही सामना खेळणे शक्य झाले नाही. यंदाच्या आयपीएल २०२३ मध्ये जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीमध्ये जोफ्रा आर्चरला मुंबईच्या संघाच्या गोलंदाजीवर विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.Read More
Ashes Series 2023: इंग्लंडला जूनमध्ये घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅशेस मालिका खेळायची आहे, ज्यामध्ये त्यांना आपल्या प्रमुख गोलंदाजाशिवाय मैदानात उतरावे लागणार…