जोस बटलर News
जॉस बटलर (Jos Buttler) हा एकदिवसीय विश्वचषक २०२३ (World Cup 2023) मध्ये पाठवण्यात आलेल्या इंग्लंडच्या क्रिकेट संघाचा कर्णधार आहे. बटलर आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वातील सर्वात विस्फोटक फलंदाजांपैकी एक आहे. वनडे आणि टी-२० या फॉरमॅटचा मास्टर आहे असे म्हटले जाते. गेल्या काही वर्षांपासून जॉस बटलर चांगल्या फॉर्ममध्येही आहे.
२०११ मध्ये त्याने भारताविरुद्ध झालेल्या टी-२० सामन्यामध्ये इंग्लंडकडून खेळत पदार्पण केले होते. पुढे लगेचच इंग्लंडच्या एकदिवसीय आणि कसोटी संघामध्ये सामील झाला. तो स्पिनर्स विरोधात खूप चांगला खेळतो असेही म्हटले जाते. त्याने आपल्या क्षमतेच्या बळावर संघाला यश मिळवून दिले आहे.
२०१९ च्या इंग्लंडच्या विश्वचषक विजयी संघाचे उपकर्णधारपद देखील बटलरकडे होते. त्याशिवाय तो यष्टीरक्षक देखील होता. या स्पर्धेमध्येही तो यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये दिसू शकतो. यंदाच्या विश्वचषकामध्ये त्याच्याकडून उत्तम खेळाची अपेक्षा चाहते करत आहेत.
Read More