काजोल Videos

काजोल देवगण ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. १९९२ साली ‘बेखुदी’ चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या काजोलला घरातूनच अभिनयाचा वारसा मिळाला. काजोलची आई तनुजा समर्थ यादेखील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहेत. बाझीगर चित्रपटामुळे काजोलला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात तिने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानसह स्क्रीन शेअर केली होती. ‘फना’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘कुछ कुछ होता है’, ‘माय नेम इज खान’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘इश्क’, ‘करण अर्जुन’ हे काजोलचे गाजलेले चित्रपट आहेत. फेब्रुवारी १९९९ मध्ये तिने अभिनेता अजय देवगणशी लग्नगाठ बांधली. काजोल व अजय देवगणला न्यासा व युग ही दोन मुले आहेत.Read More